शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 10:09 IST

१९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी-२१९ महामार्गाचा विस्तार करत आहे.

नवी दिल्ली - चीनने कुरापती पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. आता तो पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) सियाचीन हिमनदीजवळ रस्ता बनवत आहे. उपग्रह छायाचित्रांच्या माध्यमातून चीनचे हे बिंग फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रस्ता काँक्रीटचा आहे. यावर भारताने आक्षेप घेतला आहे.

हा रस्ता बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरमध्ये म्हणजेच सियाचीनच्या उत्तरेला, जगातील सर्वात उंच युद्धभूमीमध्ये बांधला जात आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, १९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी-२१९ महामार्गाचा विस्तार करत आहे. हा भाग चीनच्या शिनजियांगला लागून आहे. हे सियाचीन हिमनदीच्या इंदिरा कोलच्या (भारताचे उत्तरेकडील सर्वात शेवटचे क्षेत्र) उत्तरेस ५० किलोमीटर अंतरावर आहे.

रस्ता पूर्णपणे बेकायदेशीरभारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल राकेश शर्मा म्हणाले की, चीनच्या दिशेने तयार करण्यात येत असलेला रस्ता पूर्णपणे बेकायदेशीर आहे. भारताने या प्रकरणाचा मुत्सद्दीपणे विरोध केला पाहिजे. ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ कारगिल, सियाचीन ग्लेशियर आणि पूर्व लडाखमध्ये तैनात आहे. मात्र, या संदर्भात भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. ते येण्याची शक्यता आहे.

कुणी टिपले छायाचित्र?वृत्तानुसार युरोप अंतराळ संस्थेने काढलेल्या उपग्रहातून स्पष्ट झाले आहे की, हा रस्ता गतवर्षी जून ते ऑगस्टदरम्यान बांधण्यात आला आहे.

चीन-पाकिस्तानची युती प्रबळ?भारत पीओकेमधील रस्ते बांधणीवर आक्षेप घेत आहे. तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे, कारण चीनने रस्ता बांधल्यानंतर पाकिस्तान आणि चीन सामरिकदृष्ट्या भारतापेक्षा अधिक मजबूत होतील, ज्यामुळे देशातील तणाव वाढेल.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तान