चीन ‘अस्थैर्य’ निर्माण करतोय
By Admin | Updated: May 31, 2014 23:18 IST2014-05-31T23:18:48+5:302014-05-31T23:18:48+5:30
चीन दक्षिण चीन समुद्रात ‘अस्थैर्य’ निर्माण करीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. चीनच्या कृतीने या भागातील दीर्घकालीन विकासास धोका निर्माण झाल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

चीन ‘अस्थैर्य’ निर्माण करतोय
>सिंगापूर : चीन दक्षिण चीन समुद्रात ‘अस्थैर्य’ निर्माण करीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. चीनच्या कृतीने या भागातील दीर्घकालीन विकासास धोका निर्माण झाल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिका आणि आग्नेय आशियाई देश सहभागी झालेल्या ‘शांग्रीला डायलॉग’ या तीन दिवसीय चर्चासत्रला संबोधित करताना अमेरिकी संरक्षणमंत्री चक हेगेल यांनी हा आरोप केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेने या मुद्यावर प्रथमच सार्वजनिक ठिकाणी थेट चीनविरोधी भूमिका मांडली आहे. हेगेल यांनी थायलंडमधील बंड संपुष्टात आणून लोकशाहीची पुनस्र्थापना करावी, असे आवाहनही यावेळी केले. चीन, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्समधील वाढता तणाव तसेच एका बेटाच्या मालकीवरून जपान व चीनमधील जुना वाद सातत्याने चिघळत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही परिषद होत आहे. ‘दक्षिण चीन समुद्रावर मालकी असल्याचा दावा करत गेल्या काही महिन्यांपासून चीन या भागातील वातावरण अस्थिर करत आहे. यासाठी त्यांच्याकडून एकतर्फी कारवाई केली जात आहे,’ असा आरोप हेगेल यांनी शनिवारी केला.
(वृत्तसंस्था)