बाल सुसंस्कार शिबिरास प्रारंभ

By Admin | Updated: May 12, 2014 18:43 IST2014-05-12T18:43:03+5:302014-05-12T18:43:03+5:30

लोहारी: संतनगरी मुंडगाव येथे प्रथमच ५ मेपासून बाल सुसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला असून, या शिबिराची समाप्ती २५ मे रोजी होणार आहे.

Child Welfare Ceremony | बाल सुसंस्कार शिबिरास प्रारंभ

बाल सुसंस्कार शिबिरास प्रारंभ

हारी: संतनगरी मुंडगाव येथे प्रथमच ५ मेपासून बाल सुसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला असून, या शिबिराची समाप्ती २५ मे रोजी होणार आहे.
या शिबिरात विद्यार्थ्यांना गीत गायन, मृदंग वादन, हरिपाठ, पावल्या, धर्म संस्कृती, हिंदू जनजागृती, संत चरित्र व थोरांचे चरित्र शिकवले जाणार आहे. शिबिरात संदीप महाराज जाधव, मृदंगाचार्य वैभव महाराज करादे, आकाश महाराज हे शिक्षक शिकवित आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर महाराज फुसे होते, तर उद्घाटक म्हणून माजी जि. प. सदस्य काशिराम साबळे होते. संचालन नरेश ठाकरे, तर आभार वांगे गुरुजी यांनी केले. यावेळी श्रीकृष्ण महाराज संस्थान तथा समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती. (वार्ताहर)

Web Title: Child Welfare Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.