चेंबरतर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:04+5:302015-08-02T22:55:04+5:30

- एलबीटी रद्द करण्याचा शासनाचा निर्णय

Chief Minister welcomed by Chamber | चेंबरतर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत

चेंबरतर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत

-
लबीटी रद्द करण्याचा शासनाचा निर्णय
नागपूर : एलबीटी रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कैलास जोगानी यांनी स्वागत केले आहे. एलबीटी दूर करून व्यापाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कैलास जोगानी यांच्या नेतृत्वात प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चेंबरने सर्व व्यापारी संघटना, सर्व व्यापारी आणि नागरिकांतर्फे राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. जोगानी यांनी सांगितले की, शासनाने व्यापाऱ्यांच्या हितार्थ घेतलेला निर्णय योग्य आहे. ९९ टक्क्यांपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. एलबीटीचा फायदा ग्राहकांना देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
प्रतिनिधी मंडळात चेंबरचे सचिव प्रदीप जाजू, उपाध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे, कोषाध्यक्ष गोविंद पसारी, सहसचिवद्वय विपीन पनपालिया व वेणूगोपाल अग्रवाल, संचालक नाथाभाई पटेल, नितीन बन्सल यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते.

Web Title: Chief Minister welcomed by Chamber