मुख्यमंत्री ८ पासून जपान दौर्यावर
By Admin | Updated: September 6, 2015 23:09 IST2015-09-06T23:09:19+5:302015-09-06T23:09:19+5:30
मुख्यमंत्री ८ पासून

मुख्यमंत्री ८ पासून जपान दौर्यावर
म ख्यमंत्री ८ पासूनजपान दौर्यावरमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ८ ते १३ सप्टेंबर दरम्यान जपानच्या दौर्यावर जाणार आहेत. या भेटीत कोयासान येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईसह राज्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कर्ज घेण्यासंदर्भात ते वित्तीय संस्थांशी चर्चा करतील. या शिवाय, उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी काही कंपन्यांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी एका शोचे आयोजन राज्य सरकारतर्फे जपानमध्ये या काळात करण्यात येणार होते. काही कलावंतदेखील त्यात सहभागी होणार होते. तथापि, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)