राज्याचा मुख्यमंत्री बहुजन हवा होता - खडसे
By Admin | Updated: November 2, 2014 19:05 IST2014-11-02T19:04:47+5:302014-11-02T19:05:09+5:30
राज्याचे मुख्यमंत्री बहुजन समाजाचे असायला हवे होते असे विधान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे.

राज्याचा मुख्यमंत्री बहुजन हवा होता - खडसे
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २ - मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरणारे एकनाथ खडसे यांची नाराजी अद्याप दूर झालेली दिसत नाही. राज्याचे मुख्यमंत्री बहुजन समाजाचे असायला हवे होते असे विधान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मतभेद दुस-याच दिवशी समोर आले आहे.
महसूल मंत्री एकनाथ खडसे रविवारी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी खडसे यांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने अजूनही नाराज असल्याचे दाखवून दिले. 'राज्यात भाजपाला सत्ता मिळाली याचा आनंदच आहे. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन असावा अशी राज्याच्या जनतेची इच्छा होती' असे सूचक विधान त्यांनी केले आहे. बहुजन म्हणजे ओबीसी, वंझारी किंवा इतर समाजातील व्यक्तीही चालली असता असेही खडसे यांनी नमूद केले. खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून काय प्रयत्न केले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.