शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे महाभारतानंतर माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 10:08 IST

त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर  मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव त्यांच्या कामकाजापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. देव यांनी महाभारत काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेली चर्चा थांबत नाही तोच त्यांनी माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

आगरतळा - त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर  मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव त्यांच्या कामकाजापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. देव यांनी महाभारत काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेली चर्चा थांबत नाही तोच त्यांनी माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. डायना हेडनला 21 वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मिस वर्ल्डच्या विजेतेपदावर बिप्लब देव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  विविध स्तरांवर आयोजित होणाऱ्या सौंदर्य स्पर्धा या बोगस असून, हेडन हिला खिताब देण्याची प्रक्रिया समजली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र ऐश्वर्या  रॉय हिच्या सौंदर्याचे देव यांनी कौतुक केले आहे. ऐश्वर्या खऱ्या अर्थाने भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते, असे त्यांनी म्हटले आहे. "आम्ही भारतीय महिलांना लक्ष्मी, सरस्वतीच्या रूपात मानतो. ऐश्वर्या रॉय भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते.  डायना मिस वर्ल्ड बनली, हे ठीक आहे, पण डायना हेडनचे सौंदर्य मला समजलेले नाही.  याआधी केला होता महाभारत काळातही इंटरनेट असल्याचा दावाभारतात फार जुन्या काळापासून इंटरनेटचा वापर केला जातोय. महाभारताच्या काळात संजय दृष्टिहीन होता. परंतु युद्धाची सर्व हकीकत तो धृतराष्ट्रांना ऐकवत होता. हे इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीमुळेच शक्य झालं आहे, त्या काळात सॅटेलाइटही अस्तित्वात होत्या, असा दावा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव  यांनी केला होता.  आगरतळ्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही स्तुती केली. नरेंद्र मोदी देशातल्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळेच देशातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून जोडली गेली आहे. मोदी लोकांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर वापरकर्ते म्हणूनही ओळखले जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा फार पूर्वापारपासून चालत आलेल्या आहेत. तेव्हापासूनच आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, असं म्हणत त्यांनी इंटरनेट महाभारत काळापासून असल्याचे सूतोवाच केले होते. 

टॅग्स :Biplab Debबिप्लब देवTripuraत्रिपुराIndiaभारत