शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांना जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता; नितीश कुमारांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 12:42 IST

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची जनसुरज पदयात्रा बिहारमध्ये सुरू आहे. दोन दिवसापूर्वी या यात्रेदरम्यान त्यांनी एक मोठा दावा केला होता.

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बिहारमध्ये जनसुरज पदयात्रा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी या यात्रेदरम्यान त्यांनी एक मोठा दावा केला होता. 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मला आपला उत्तराधिकारी बनण्याची ऑफर दिली होती, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. या दाव्याला आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

"प्रशांत किशोर भाजप पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिल्याचेही ते म्हणाले.तसेच प्रशांत किशोर यांनी उत्तरादिकारीवरुन केलेल्या दावाही नितीश कुमार फेटळून लावला आहे. 

"प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत आहेत. जेडीयूचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा सल्लाही मला प्रशांत किशोर यांनी दिला होता. उत्तराधिकारी बनवायच्या दाव्यावर बोलताना नितीश कुमार म्हणाले, "प्रशांत किशोर काहीही बोलत राहतात, ते भाजपला मदत करत आहेत. प्रशांत किशोर यांना मी फोन केला नव्हता, ते स्वतः आले होते. मी त्यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही.", असंही नितीश कुमार म्हणाले.  

Bihar Politics: जेडीयू-आरजेडीमध्ये तणाव! महाआघाडीत सहभागी झालेले हे छोटे पक्ष करतायत मोठी मागणी 

प्रशांत किशोर यांची बिहारमध्ये जन सुरज यात्रा सुरू आहे. या यात्रेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संदर्भात मोठा दावा केला होता. ''मला नितीश कुमार यांनी उत्तराधिकारी बनण्याची ऑफर दिली होती असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. पण  मी कोणाला ओळखत नसल्याने मी नकार दिला.बिहारच्या जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले पाहिजे, असंही ते म्हणाले. 

जेडीयू-आरजेडीमध्ये तणाव!

बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीत सहभागी असलेले छोटे पक्ष आता एका समन्वय समितीची मागणी करताना दिसत आहेत. यासंदर्भात चर्चाही सुरू झाली आहे. नुकतेच तत्कालीन कृषीमंत्री सुधाकर सिंह यांचा राजीनामा, त्यांचे वडील तथा आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आणि जेडीयूतील नाराजीनंतर अशा प्रकारची समिती असावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

खरे तर, आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी नुकतेच, 2023 पर्यंत तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील, अशा आशचे  वक्तव्य केले होते. यामुळे जेडीयूचे अनेक नेते नाराज झाले. सत्ताधारी महाआघाढीतील जेडीयू आणि आरजेडी या दोन सर्वात मोठ्या घटक पक्षांत तणाव निर्माण झाल्याने सरकारमध्ये सहभागी असलेल्या छोट्या पक्षांनी सरकारचे कामकाज सुरळितपणे चालावे यासाठी एक समन्वय समिती लवकरात लवकर स्थापन करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारcongressकाँग्रेस