दिल्लीत एकनाथ शिंदे अन् संभाजीराजेंची भेट; मराठा आरक्षणासह विविध विषयांवर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:23 IST2022-09-22T18:13:42+5:302022-09-22T18:23:43+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

Chief Minister Eknath Shinde's visit at Chhatrapati Sambhaji Raje's residence | दिल्लीत एकनाथ शिंदे अन् संभाजीराजेंची भेट; मराठा आरक्षणासह विविध विषयांवर झाली चर्चा

दिल्लीत एकनाथ शिंदे अन् संभाजीराजेंची भेट; मराठा आरक्षणासह विविध विषयांवर झाली चर्चा

नवी दिल्ली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सदर भेटीची माहिती स्वत: संभाजीराजे यांनी दिली. 

संभाजीराजे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माझ्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी नुकताच शासनाने जीआर काढल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन केले, व उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती करिता समन्वय साधण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र डेस्क सुरू करावा, अशी मागणी केली. तसेच, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.

गडकोटांचे संवर्धन, मुंबई ते किल्ले रायगड असे सी, फोर्ट सर्किट टूरिझम, पर्यटन विकास या विषयांवर देखील सकारात्मक चर्चा झाली. हे वर्ष राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करावी, अशीही मागणी केली. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे विचार-कार्य जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य शासनातर्फे विशेष उपक्रम राबवावेत, अशी संकल्पना मांडली. यावेळी त्यांच्यासह नामदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, कॅ. अभिजीत अडसूळ, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव उपस्थित होते.

Web Title: Chief Minister Eknath Shinde's visit at Chhatrapati Sambhaji Raje's residence