शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब सरकारने १२,५०० शिक्षकांना केले पर्मनंट; महिला शिक्षिकेला भेटताच मुख्यमंत्री भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 17:10 IST

punjab teacher permanent : पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेत राज्यातील १२,५०० शिक्षकांना पर्मनंट केले आहे.

bhagwant mann : पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेत राज्यातील १२,५०० शिक्षकांना पर्मनंट केले आहे. यावेळी शिक्षकांचे मनोगत ऐकून मुख्यमंत्रीभगवंत मान भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, मी देखील एका शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे मला त्यांचे दुःख समजते. तसेच यावेळी मान यांनी मागील सरकारवर टीकास्त्र देखील सोडले. या बैठकीला अनेक शिक्षकही उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री मान यांनी शिक्षकांच्या यातना सांगितल्या. "मागील सरकारने या शिक्षकांची थट्टा उडवली होती. कमी पगारात त्यांना काम करावे लागत होते. या शिक्षकांना प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या देखील खाव्या लागल्या. अधिकाऱ्यांनी शिक्षकांचा हा प्रश्न मार्गी लावण्यात अनेक कायदेशीर अडथळे आणले. परंतु, मी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा. सरकारकडे भरपूर पैसा आहे पण हेतू स्पष्ट असणे गरजेचे आहे", असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यादरम्यान, भगवंत मान यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून आता पंजाबमधील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना बसेस उपलब्ध होणार आहेत. यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करणार असल्याचे मान यांनी सांगितले. यासाठी २१ कोटी रूपये खर्च येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्री मान झाले भावुकशिक्षकांना पर्मनंट केल्यानंतर प्रमाणपत्र देताना मुख्यमंत्री भगवंत मान भावुक झाले. एका शिक्षिकेने तिची कहाणी सांगितली अन् मान यांना अश्रू अनावर झाले. खरं तर या शिक्षिकेची १४ महिन्यांची मुलगी रुथ हिचा जानेवारी २०१४ मध्ये शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. मनोगत व्यक्त करण्यासाठी महिला शिक्षिका रडतच मंचावर आली, जे पाहून मुख्यमंत्री मान भावुक झाले. जानेवारी २०१४ मध्ये या सर्व शिक्षकांनी पर्मनंटच्या मागणीसाठी भटिंडा येथे आंदोलन केले होते, त्यावेळी या चिमुकलीचा थंडीमुळे मृत्यू झाला होता.

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानAAPआपChief Ministerमुख्यमंत्रीTeacherशिक्षक