शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सीबीआय प्रमुखपदी पसंतीच्या नियुक्तीची केंद्राची योजना सरन्यायाधीशांनी उधळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 06:15 IST

CBI chief appoint News: केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) प्रमुख पदावर आपल्या पसंतीच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची सरकारची योजना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी यशस्वी होऊ दिली नाही.

नवी दिल्ली : केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) प्रमुख पदावर आपल्या पसंतीच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची सरकारची योजना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी यशस्वी होऊ दिली नाही. सरकारच्या प्रयत्नांना त्याआधी काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी यांनीही सातत्याने आक्षेप घेतले होते.सरकारकडे राकेश अस्थाना (सीमा सुरक्षा दलाचे  आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे महासंचालक), एच. सी. अवस्थी (उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक) आणि डॉ. वाय. सी. मोदी (राष्ट्रीय तपास प्राधिकरणचे महासंचालक) अशी तिघांची नावे होती. प्रारंभी सरकारने या पदासाठी भारतीय पोलीस सेवेतील १०९ अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवली होती. परंतु, सोमवारी बैठकीच्या आधी पाच तास सरकारने १० नावांची यादी पाठवली.  बैठकीच्या आधी दोन तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीतील डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल ॲण्ड ट्रेनिंगने फक्त सहा अधिकाऱ्यांची नावे असलेली यादी पाठवली. या यादीतही वरील तीन नावे समाविष्ट होतीच.सरन्यायाधीश रमणा म्हणाले, सहा महिन्यांचा नियम असे सांगतो की, ज्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ सहा महिन्यांपेक्षा कमी राहिलेला आहे त्याच्या नावाचा विचार सीबीआयच्या प्रमुख पदासाठी केला जाऊ शकत नाही.  या नियमाला अधिर रंजन चौधरी यांनी पाठिंबा दिला. यामुळे तीन सदस्यांच्या या समितीत बहुमत निर्माण झाले. राकेश अस्थाना हे अपात्र ठरले आणि वाय. सी. मोदी हे येत्या तीन महिन्यांत निवृत्त होत आहेत. अंतिम निवड झालेल्या नावांना चौधरी यांचा काही आक्षेप नव्हता. सरकार उमेदवारांची यादी बनवताना  ‘प्रासंगिक भूमिका’ अवलंबते, असा आरोप करणारी मतभेदाची नोंद केली गेली.जयस्वाल यांची नियुक्तीमहाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, सशस्त्र सीमा बलचे महासंचालक के. आर. चंद्रा आणि गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही.एस.के. कौमुदी या तिघांमध्ये जयस्वाल हे अत्यंत वरिष्ठ असल्याने त्यांची नियुक्ती झाली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय