शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सरन्यायाधीश उदय लळीत न्यायालयाच्या पायऱ्यांवर झाले नतमस्तक! ७४ दिवसांत १० हजार खटले काढले निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 08:57 IST

३७ वर्षे सर्वोच्च न्यायालयात काम केल्यानंतर सरन्यायाधीश यू. यू. लळीत कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी भावुक झाले.

नवी दिल्ली 

३७ वर्षे सर्वोच्च न्यायालयात काम केल्यानंतर सरन्यायाधीश यू. यू. लळीत कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी भावुक झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्यांवर डोके ठेवून ते नतमस्तक झाले. भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड बुधवारी शपथ घेणार आहेत.

सरन्यायाधीश लळीत ३७ वर्षे सर्वोच्च न्यायालयात होते. पहिली २९ वर्षे वकील म्हणून आणि शेवटची ८ वर्षे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले. मंगळवारी सायंकाळी ते न्यायालयात आले होते.

कामावर समाधानी, आश्वासने जवळपास पूर्णमी जेव्हा या पदावर आलो तेव्हा एकच ध्येय होते की घटनापीठाने काम केले पाहिजे. म्हणूनच मी सहा घटनापीठे तयार केली. सर्व न्यायाधीशांना कोणत्या ना कोणत्या पीठात नेमले. खटले लवकर निकाली निघावेत म्हणून मी सर्व न्यायाधीशांशी बोललो आणि कामाची विभागणी केली. मी माझ्या कामावर समाधानी आहे व मी माझी आश्वासने जवळपास पूर्ण केली आहेत, असे लळीत म्हणाले.

लळीत यांचे ४ मोठे निर्णय...

  • गुजरात दंगलीची सर्व प्रकरणे बंद
  • छावला सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींची निर्दोष मुक्तता
  • तिस्ता सेटलवाड, कप्पन सिद्दिकी यांना जामीन
  • ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मुद्दा निकाली

७४ दिवसांत १० हजार खटले निकालीसरन्यायाधीश लळीत यांनी ७४ दिवसांच्या कार्यकाळात एकाहून अधिक घटनापीठ स्थापन करण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या काळात १० हजारांहून अधिक खटले निकाली काढण्यात आले, तर गुणवत्तेअभावी समारे 23 हजार प्रकरणे फेटाळण्यात आली.

टॅग्स :Uday Lalitउदय लळीत