शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 15:51 IST

काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे.

ठळक मुद्देराज्यात कलम ३७० लागू करण्याची आणि राज्यातील पूर्वस्थिती पुन्हा लागू करण्याची काश्मिरी पक्षांची मागणी काश्मिरी पक्षांच्या या मागणीस पी चिदंबरम यांनी दिला पाठिंबा जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीरचे द्विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णय गतवर्षी झाला होता

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीरचे द्विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आता एक वर्ष उलटून गेले आहे. दरम्यान, आता वर्षभरानंतर कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, काश्मिरी पक्षांच्या या जाहीरनाम्यास काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे.काश्मिरी पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना एक संयुक्त निवेदन दिले असून, त्या माध्यमातून राज्यात कलम ३७० लागू करण्याची आणि राज्यातील पूर्वस्थिती पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. काश्मिरी पक्षांच्या या मागणीस पी चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारविरोधात उभ्या राहिलेल्या सहा काश्मिरी पक्षांना सॅल्युट ठोकला आहे.चिदंबरम यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून त्यात ते म्हणतात की, कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकजूट झाले्ल्या मुख्य प्रवाहातील पक्षांमधील ऐक्य आणि हिंमतीला माझा सलाम. आता तुम्ही या मागणीसाठी ठाम राहा. स्वयंभू राष्ट्रवाद्यांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका. जे इतिहास वाचत नाहीत. तर इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या विचार करू नका असा माझा तुम्हाला सल्ला आहे.

देशाच्या घटनेमध्ये राज्यांसाठी काही विशेष तरतुदींचे अनेक उल्लेख आहेत. जर सरकार या विशेष उल्लेखांना विरोध करत असेल तर तर नागांच्या प्रश्नासारखे प्रश्न कसे सोडवता येतील, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.काश्मिरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू व्हावे यासाठी पक्षांनी आपला जाहीरनामा तयार केला आहे. त्यामध्ये नॅशनल कॉन्फ्रन्सचे फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, जेकेपीसीसीचे जीए मीर, माकपचे एमवाय तारिगामी, जेकेपीसीचे सज्जाद गनी लोन, जेकेएएनसीचे मुझफ्फर शाह यांच्या नावांचा समावेश आहे.५ ऑगस्ट् २०१९ रोजी झालेल्या घटनेने केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील नाते पूर्णपणे बदलून गेले आहे. जम्मू काश्माीरमधील शांतताप्रिय लोकांसाठी हा कसोटीचा काळ आहे. अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण घटनेनुसार जम्मू काश्मीरला विशेर राज्याचा दर्जा परत मिळवण्यासाठी सामूहिकरीत्या लढण्यासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत आहोत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370PoliticsराजकारणP. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेस