शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

'फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रिया... 12 ठिकाणी आहे, चिदंबरम यांची संपत्ती' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 10:48 IST

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सीबीआयने दावा केला आहे की, पी. चिदंबरम यांची अनेक देशात बँक खाती आहेत. 

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची विदेशात संपत्ती असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केला आहे. या प्रकरणातील आरोपींसह पी. चिदंबरम विदेशात संपत्ती विकण्यासाठी आणि विदेशी बँक खाती बंद करुन पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे ईडीने म्हटले आहे. 

दरम्यान, सोमवारी सीबीआयने पुन्हा पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टापुढे हजर करून आणखी पाच दिवसांच्या कोठडीसाठी अर्ज केला. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कुहार यांनी आणखी चार दिवसांच्या कोठडीचा आदेश दिला. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सीबीआयने दावा केला आहे की, पी. चिदंबरम यांची अनेक देशात बँक खाती आहेत. 

ईडीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पी चिदंबरम आणि याप्रकरणातील अन्य आरोपींनी अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, ब्रिटिश  व्हर्जिन आईसलँड, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनाको, फिलिफिन्स, सिंगापूर, साऊथ आफ्रिका, स्पेन, श्रीलंका याठिकाणी संपत्ती खरेदी केली आहे. तसेच, येथील बँकांमध्ये खाती उघडून बनावट कंपन्याच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण केली आहे. तसेच, पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जाला विरोध करत ईडीने त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला. 

सुप्रीम कोर्टात सुनावणी अपूर्णअटकपूर्व जामीन नाकारण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध पी.चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात दोन अपिले केली होती. ती सुनावणीस येण्याआधीच ‘सीबीआय’ने त्यांना अटक केल्याने त्यासंबंधीचे अपील न्यायालयाने आता निरर्थक झाल्याचे ठरवून निकाली काढले. ‘ईडी’च्या प्रकरणातील अपिलावर न्या. आर. भानुमती व न्या. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढील सुनावणी अपूर्ण राहिली. ती मंगळवारी पुन्हा होईल. तोपर्यंत अटक न करण्याचा तात्पुरता आदेश लागू राहील.

(पी. चिदम्बरम यांची आणखी चार दिवस कोठडीत रवानगी)

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग