शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:33 IST

Chhattisgarh Operation Black Forest: छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापुर-दंतेवाडा परिसरात 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट'मध्ये 27 नक्षलवादी ठार झाले आहेत.

Chhattisgarh Operation Black Forest:छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 27 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. पोलिसांनी बुधवारी (21 मे) दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी या चकमकीत टॉप नक्षलवादी कमांडर आणि सीपीआय माओवादी सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ ​​बसवराजू याचाही खात्मा केला. या घटनेत एक सुरक्षा कर्मचारी शहीद झाला आणि काही इतर कर्मचारी जखमी झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, या कारवाईनंतर गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की, या उल्लेखनीय यशाबद्दल आम्हाला सुरक्षा दलांचा अभिमान आहे. आमचे सरकार माओवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणि देशातील नागरिकांना शांतता आणि प्रगतीचे जीवन सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.

पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त, गृहमंत्री अमित शाह यांनीही एक्स पोस्टमध्ये म्हटले, छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 27 माओवाद्यांना ठार मारले, ज्यात सीपीआय-माओवादी सरचिटणीस, सर्वोच्च नेता आणि नक्षलवादी चळवळीचा कणा असलेल्या नंबला केशव राव उर्फ ​​बसवराजू याचा समावेश आहे. भारताच्या नक्षलवादविरोधी लढाईच्या तीन दशकांमध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आपल्या सुरक्षा दलांनी सरचिटणीस दर्जाच्या नेत्याला ठार मारले आहे. या यशाबद्दल मी आपल्या शूर सुरक्षा दलांचे आणि एजन्सींचे कौतुक करतो. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पूर्ण झाल्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती अमित शाहांनी दिली.

अशी झाली चकमकया प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, नारायणपूर-विजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या अबुझमद परिसरात नक्षलवाद्यांची केंद्रीय समिती, पॉलिटब्युरोच्या सदस, माड डिव्हिजन आणि पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) चे नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आले. आज सुरक्षा दल परिसरात असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. या कारवाईदरम्यान आतापर्यंत 27 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत एक डीआरजी जवान शहीद झाला, तर इतर काही जवान जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड