नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई करण्याची तयारी? अमित शाहांची MHA, CRPF च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 08:04 PM2021-04-04T20:04:38+5:302021-04-04T20:06:22+5:30

Chhattisgarh naxal attack: बैठकीत गृहसचिव, सीआरपीएफचे अधिकारी, गुप्तचर विभागाचे अधिकारी आणि सहसचिव एलडब्ल्यूई सहभागी असल्याचे वृत्त आहे.

Chhattisgarh naxal attack: Home Minister Amit Shah holds high-level security meeting | नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई करण्याची तयारी? अमित शाहांची MHA, CRPF च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई करण्याची तयारी? अमित शाहांची MHA, CRPF च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

Next
ठळक मुद्देछत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाले.

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील विजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा आसाम दौरा रद्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह आसामहून परत दिल्लीत आल्यानंतर या नक्षली हल्ल्याबाबत एक मोठी बैठक झाली. अमित शाह यांनी दिल्लीत MHA आणि CRPF च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. (Chhattisgarh naxal attack: Home Minister Amit Shah holds high-level security meeting)

या बैठकीत स्पेशल डीजी संजय चंदरही उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. या बैठकीत नक्षलवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई करण्याचे धोरण आखले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या नक्षली हल्ल्याची चौकशी करण्याचे काम 'एनआयए'कडे सोपविले जाण्याची शक्यता आहे. 

गृहमंत्री अमित शाह रविवारी आसाममध्ये विधानसभा निवडणूक प्रचार सभेसाठी दाखल झाले होते. मात्र, छत्तीसगडमधील या नक्षली हल्ल्यानंतर अमित शाह यांनी नियोजित दौरा रद्द करत नक्षली हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आणि आजच दुपारी ते दिल्लीला परतले. यानंतर दिल्लीत त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलवली. या बैठकीत गृहसचिव, सीआरपीएफचे अधिकारी, गुप्तचर विभागाचे अधिकारी आणि सहसचिव एलडब्ल्यूई सहभागी असल्याचे वृत्त आहे.

(छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांची आसाममधील निवडणूक रॅली रद्द!)

याआधी रविवारी सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याबद्दल ट्विट केले आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढा देताना शहीद झालेल्या आमच्या बहादूर सुरक्षा जवानांच्या बलिदानास मी सलाम करतो. त्याचा पराक्रम देश कधीही विसरणार नाही. आम्ही शांतता आणि प्रगतीच्या या शत्रूंविरूद्ध आपला लढा सुरू ठेवू. जखमी जवान लवकरच बरे होतील, यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा, असे अमित शाह यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. तसेच, अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी या घटनेविषयी चर्चा केली असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

(नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद; रॉकेट लाँचर, LMG नं केला होता हल्ला)

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद!
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाले. सुरक्षा दलावर नक्षलवादी संघटना पीपल्स लिबरेशन ग्रुप आर्मी प्लाटून वनच्या युनिटनं केला होता. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत १५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परंतु सुरक्षा दलाचे जवान ज्यावेळी आत शिरत होते त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तीन प्रकारे त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. सुरूवातीला बुले, त्यानंतर अन्य हत्यारं आणि रॉकेट लाँचरने २००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. 
 

Web Title: Chhattisgarh naxal attack: Home Minister Amit Shah holds high-level security meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.