शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्याने शब्द पाळला; BJP उमेदवार पराभूत होताच मुंडन केले, मिशा कापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:50 IST

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-२ असा विजय मिळवला.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-२ असा विजय मिळवला. तेलंगणा आणि मिझोराम वगळता तीन राज्यांत भाजपाची सत्ता आली. मध्य प्रदेशात सत्ता कायम राखण्यात भाजपाला यश आले, तर छत्तीसगड आणि राजस्थानात काँग्रेसला सुरूंग लावत भाजपाने सत्ता काबीज केली. राजस्थानच्या जनतेने परंपरा कायम राखली पण छत्तीसगडमधील निकालाने राजकीय पंडितांना देखील धक्का बसला. भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असूनही काँग्रेसला सत्ता राखता आली नाही. भाजपाने राज्यात विजय मिळवला पण खल्लारी विधानसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला अन् भलत्याच कारणामुळे ही जागा चर्चेत आली. 

महासमुंद जिल्ह्यातील खल्लारी विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवाराच्या विजयासाठी एका कार्यकर्त्याने पैज लावली होती. मात्र, भाजपाचा उमेदवार निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजपाचा एक कार्यकर्ता डेहराम यादव याने मिशा कापल्या आणि मुंडन केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार पडल्यास मी मुंडन करेन असा दावा डेहरामने केला होता. ४८ वर्षीय डेहरामने खल्लारी विधानसभेतील भाजपा उमेदवार अलका चंद्राकर यांच्या विजयाचा दावा करत मित्रासोबत पैज लावली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे निवडणूक हरल्यानंतर त्याने मिशा कापून दिलेला शब्द पाळला. 

भाजपाचा काँग्रेसला दे धक्का दरम्यान, डेहरामने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अलका चंद्राकार यांच्या विजयाचा दावा केला होता. पण, जनतेने कौल काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने दिला. तसेच भाजपा उमेदरावाराचा पराभव झाल्यास मी मिशा कापेन आणि मुंडन करून गावभर फिरेन असा शब्द डेहरामने त्याच्या मित्राला दिला होता. आता निकाल लागल्यानंतर त्याने दिलेला शब्द पाळला. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक पार पडली. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत भाजपाने ५४ जागा जिंकून सत्ता मिळवली. तर काँग्रेसला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय १ जागा इतरांच्या खात्यात गेली.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाcongressकाँग्रेसSocial Viralसोशल व्हायरल