धक्कादायक! अल्पवयीन मुलीनं वसतिगृहाच्या शौचालयातच मृत बाळाला दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 14:04 IST2020-01-19T14:00:56+5:302020-01-19T14:04:41+5:30
छत्तीसगडमधल्या दंतेवाडातल्या पताररसमध्ये 11वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलीनं शौचालयात एका मृत बाळाला जन्म दिला.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीनं वसतिगृहाच्या शौचालयातच मृत बाळाला दिला जन्म
दंतेवाडाः छत्तीसगडमधल्या दंतेवाडातल्या पताररसमध्ये 11वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलीनं शौचालयात एका मृत बाळाला जन्म दिला. प्रकरण उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. असुरक्षित प्रसूती झाल्यानं जन्मानंतर नवजात बाळाचा मृत्यू झाला. लग्न न करताच बाळाला जन्म दिल्यानं परिवारही शोक सागरात बुडाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुंडरदेहीचे पोलीस रुग्णालयात पोहोचले असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलीस पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ही पूर्ण घटना वसतिगृहाची अधीक्षिका हेमलता नाग यांच्यासमोरच घडली आहे. प्रकरण दाबण्यासाठी त्या खोटं बोलल्या म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
पोटात दुखत असल्याचं सांगत केलं होतं रुग्णालयात दाखल
दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला बुधवारी सकाळी पोटात खूप वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तत्पूर्वीच तिनं वसतिगृहात मृत बाळाला जन्म दिला होता. कुटुंबीयांना जेव्हा मुलगी गर्भवती होती, तिनं बाळाला जन्म दिल्याचं समजलं तेव्हा त्यांना धक्काच बसला.
गावातल्या मुलाबरोबर होते शारीरिक संबंध
उपजिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. बाळ मृत होतं. मुलीचे गेल्या दोन वर्षांपासून गावातल्या एका मुलासोबत शारीरिक संबंध होते. वसतिगृहातल्या अधीक्षिकेलाही या प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर तिला रुग्णालयात आणण्यात आलं. तपासाच्या आधारावर कारवाई करण्यात येणार असून, मृत बाळाला मुलीच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.