शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

Beirut Blast: भारतातही बैरुतसारख्या स्फोटाचा धोका; सरकारी यंत्रणांनी सुरु केल्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 11:37 IST

बैरुतमधील भीषण स्फोटाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नवी दिल्ली: लेबननची राजधानी असललेल्या बैरूत बंदरावरील एका वखारीत साठवून ठेवण्यात आलेल्या २७५० टन अमोनियम नायट्रेटला आग लागल्याने हा शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात १३० जण ठार, तसेच ५ हजार जण एकूण जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटाने बैरुत शहरातील अनेक भाग हादरले. ठिकठिकाणांहून धूरांचे प्रचंड लोळ निघत होते. या स्फोटाने संपूर्ण शहराच प्रचंड घबराट पसरली होती. 

बैरुतमधील भीषण स्फोटाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जगभरातून या भीषण स्फोटानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता बैरुतसारखा अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा भारतातही असल्याचं समोर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या बाहेर कस्टम विभागाने गेल्या काही वर्षांपासून जवळपास ७४० टन अमोनियम नायट्रेटचा साठा केला आहे. याबद्दल आथा चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने या साठ्याबाबत माहिती देताना सांगितले की, अमोनियम नायट्रेट भारतातील फटाक्यांची मोठी कंपनी असलेल्या शिवकाशीमधील एका ग्रुपला पाठवण्यात येत होता. तेव्हा २०१५ मध्ये चेन्नईमधील बंदरात हा साठा जप्त केला होता. मात्र हा अमोनियम नायट्रेटचा साठा आजही तसाच गोदामात पडून आहे.  तसेच या परिसरात जवळपास १२,००० लोक राहत असल्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

बैरुत स्फोटांचं उदाहरण देत अण्णाद्रमुकचे सहकारी पक्ष पीएमकेचे प्रमुख रामदास यांनी अमोनियम नायट्रेटची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची आणि इतर उत्पादने तयार करण्यासाठी काळजी घेऊन वापर व्हावा, अशी मागणी केली आहे. चेन्नईतील वेअरहाऊसमध्ये अमोनियम नायट्रेटचा स्फोट होण्याची भीती आहे. त्यामुळे अमोनियम नायट्रेटसह स्फोटक पदार्थांची योग्य त्या सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मागणी रामदास यांनी केली आहे.

टॅग्स :Beirut Blastबेरुतमध्ये स्फोटIndiaभारतChennaiचेन्नई