चीअर्स - फक्त महिलांसाठी असलेला पहिला बीअर बार दिल्लीत सुरू

By Admin | Updated: March 11, 2016 18:58 IST2016-03-11T18:58:05+5:302016-03-11T18:58:05+5:30

फक्त महिलांसाठी बीअर बार ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये नवी दिल्लीने बाजी मारली असून स्मार्टी पिन्ट्स सोसायटी या नावाने हा बार सुरू झाला आहे.

Cheers - The first beer bar for women only to start in Delhi | चीअर्स - फक्त महिलांसाठी असलेला पहिला बीअर बार दिल्लीत सुरू

चीअर्स - फक्त महिलांसाठी असलेला पहिला बीअर बार दिल्लीत सुरू

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - फक्त महिलांसाठी बीअर बार ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये नवी दिल्लीने बाजी मारली असून स्मार्टी पिन्ट्स सोसायटी या नावाने हा बार सुरू झाला आहे. करीना अगरवाल यांनी हा बीअर क्लब सुरू केला असून बायकांना मनसोक्त आनंद लुटता येईल, मैत्रिमी बनवता येतील आणि चवीनं बीअर पिता येईल अशी हमीही त्यांनी दिली आहे. 
 
कुणासाठी आहे हा क्लब?
- बीअर हे पुरुषाचं पेय आहे, हे ऐकण्याचा ज्यांना कंटाळा आलाय अशांसाठी.
- एकावर एक अनेक बीअर रिचवू शकणाऱ्या महिलांसाठी फक्त नाही, तर ज्यांना चवीनं बीअर प्यायची आहे त्यांच्यासाठीही.
 
इथे येण्याचा फायदा काय?
- सगळ्यांना माहित असलेल्या त्याच त्याच बीअरपेक्षा वेगळ्या चवीच्या बीअर आहेत म्हणून.
- देशातल्या पहिल्या फक्त महिलांसाठी असलेल्या बीअर बारमध्ये जावं म्हणून.
- आणि दर्जेदार बीअर एज्युकेशनसाठीपण...
 
लाचपत नगरमधल्या डिफेन्स कॉलनीत सुरू झालेला हा फर्स्ट विमेन ओन्ली बीअर क्लब कदाचित भारतातल्या अन्य शहरांसाठी मार्गदर्शक ठरेल अशीही शक्यता आहे.

Web Title: Cheers - The first beer bar for women only to start in Delhi