माझी गुणवत्ता कामावरून तपासा
By Admin | Updated: May 30, 2014 03:29 IST2014-05-30T03:29:52+5:302014-05-30T03:29:52+5:30
शैक्षणिक पात्रतेवरून मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची काँग्रेसने कोंडी चालवली असताना आज गुरुवारी स्वत: स्मृती मौन तोडून आपल्या बचावार्थ मैदानात उतरल्या़

माझी गुणवत्ता कामावरून तपासा
नवी दिल्ली : शैक्षणिक पात्रतेवरून मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची काँग्रेसने कोंडी चालवली असताना आज गुरुवारी स्वत: स्मृती मौन तोडून आपल्या बचावार्थ मैदानात उतरल्या़ माझ्या कामावरून माझी गुणवत्ता व योग्यता तपासली जायला हवी, असे त्या म्हणाल्या़ कामावरून माझे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांनी अकारण वाद निर्माण केला आहे़ माझ्या कामावरून माझी योग्यता तपासा, यापेक्षा अधिक मी काहीही बोलणार नाही, असे स्मृती यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले़ महिला हक्क कार्यकर्ता मधू किश्वर यांनी सर्वप्रथम स्मृती इराणींच्या शैक्षणिक योग्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते़ इराणी केवळ १२ वी उत्तीर्ण असताना त्यांना मनुष्यबळ विकास मंत्री बनविण्यात येत आहे, असे त्यांनी म्हटले होते़ या वादात नंतर काँग्रेसनेही उडी घेतली होती़ त्यानंतर भाजपाने थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर प्रतिहल्ला केला होता़ (लोकमत न्यूज नेटवर्क)