शिरूर सेवा सोसायटीवर चव्हाण गटाचे वर्चस्व
By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:58+5:302015-04-04T01:54:58+5:30
उमरी : तालुक्यातील शिरूर सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवून आ़ वसंतराव चव्हाण गटाने वर्चस्व मिळविले़ माजी आ़ गोरठेकर गटाचे दोन संचालक निवडून आले़

शिरूर सेवा सोसायटीवर चव्हाण गटाचे वर्चस्व
उ री : तालुक्यातील शिरूर सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवून आ़ वसंतराव चव्हाण गटाने वर्चस्व मिळविले़ माजी आ़ गोरठेकर गटाचे दोन संचालक निवडून आले़सेवा सहकारी सोसायटीचे विजयी उमेदवार याप्रमाणे- गोविंदराव वंचेवाड, शिवराम उर्फ बाबुराव जाधव, जळबा पोशी, उत्तम पडोळे, कैलास मामडे, बाबु चव्हाण, बालाजी राठोड, आनंदा गाढेवाड, लिंगराम, गंगाराम, पद्मीनबाई जाधव, आनंदा शिंदे, गोरठेकर गटाचे संतोष गोविंदराव शिरूरकर व सुमनबाई दत्ता वंचेवाड हे दोघे विजयी झाले़ सदर निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आत्तम चव्हाण, देविदास शिंदे, सरपंच प्रतिभा दिलीप डोंगरे, उपसरपंच हौसाजी यनगुंदलवाड, रावसाहेब पडोळे, महेबुब पठाण, शकर पिंगलवाड, माधव बोईनवाड, मिठूमियाँ आदींनी विशेष परिश्रम घेतले़