चौटाला पिता- पुत्राचा १० वर्षे कारावास कायम
By Admin | Updated: March 6, 2015 00:03 IST2015-03-06T00:03:26+5:302015-03-06T00:03:26+5:30
ओमप्रकाश चौटाला, त्यांचे पुत्र अजय चौटाला आणि इतर तिघांना कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली १० वर्षे कारावासाची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम केली.

चौटाला पिता- पुत्राचा १० वर्षे कारावास कायम
नवी दिल्ली : प्राथमिक शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला, त्यांचे पुत्र अजय चौटाला आणि इतर तिघांना कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली १० वर्षे कारावासाची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम केली.
न्या. सिद्धार्थ मृदुल यांनी १० वर्षे कैदेची शिक्षा कायम ठेवताना त्यांनी शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया कलंकित केली असून भ्रष्टाचाराने या नियुक्ती प्रणालीचे फार मोठे नुकसान केले असल्याचा ठपका ठेवला. (लोकमत न्यूज नेटवर्क)