शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा महिला नेत्याच्या मृत्यूने खळबळ; पाय दुखल्याने रुग्णालयात नेलं, इंजेक्शन दिल्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:59 IST

कानपूरमध्ये एका भाजपा महिला नेत्याच्या पायात वेदना होत होत्या. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये नेलं.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका भाजपा महिला नेत्याच्या पायात वेदना होत होत्या. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी एका प्रायव्हेट नर्सिंग होममध्ये नेलं. उपचारादरम्यान त्यांना एक इंजेक्शन देण्यात आलं. पण काही काळानंतर रुग्णाची तब्येत आणखी बिघडली आणि मृत्यू झाला.

महिला भाजपा नेत्याच्या नातेवाईकांनी रुग्णाला चुकीचं इंजेक्शन देण्यात आल्यामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबातील सदस्यांनी यानंतर नर्सिंग होममध्ये गोंधळ घातला. यावेळी नर्सिंग होममधील काही स्टाफनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रकरण शांत झाले.

"आईच्या पायामध्ये खूप वेदना होत होत्या"

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या महिला नेत्या सुनीता शुक्ला यांचा पाय खूप दुखत असल्याने त्या उपचार घेण्यासाठी नर्सिंग होममध्ये आल्या होत्या. त्यांच्या मुली तृप्ती आणि रिचा देखील त्यांच्यासोबत होत्या. मुलींनी सांगितलं की, आईच्या पायामध्ये खूप वेदना होत होत्या. आम्ही उपचारासाठी नर्सिंग होममध्ये आलो होतो. त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर नव्हते. तिथे फक्त कंपाउंडर आणि नर्स होत्या. 

"रुग्णालय प्रशासनाच्या लोकांनी मारहाण केली"

थोड्याच वेळात त्यांनी आमच्या आईला थेट आयसीयूमध्ये नेलं. आम्हाला माहीत नाही की, त्यांनी तिथे असं कोणतं इंजेक्शन दिलं की, आईची प्रकृती बिघडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. जेव्हा आम्ही आईच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारू लागलो तेव्हा रुग्णालय प्रशासनाच्या लोकांनी आम्हाला मारहाण केली. गोंधळ सुरू होताच पोलीस आणि भाजपाचे नेते घटनास्थळी पोहोचले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाhospitalहॉस्पिटल