स्वस्त धान्य दुकान बदलून द्या
By admin | Updated: March 15, 2016 00:32 IST
जळगाव : प्रभाग क्र.२२ मधील स्वस्त धान्य दुकान चौघुले प्लॉट, प्रजापत नगर येथे स्थलांतरीत झाले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना स्वस्त दुकान बदलून देण्याची मागणी महिला व बालकल्याण सभापती खुशबू बनसोडे यांनी तहसीलदार गोविंद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्याचा दुकानदार हा माल कमी देतो. तसेच सरकारमान्य दुकानाची मालाची पावती देत नसून कोर्या कागदावर लिहून देतो. जाब विचारल्यास अरेरावी करतो. तसेच मनमानीपणे धान्य संपल्याचा बोर्ड लावून टाकतो, अशी तक्रारही बनसोडे यांनी केली आहे.