चांद्रयान -2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, इस्रोने दिली माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 10:09 AM2019-08-20T10:09:37+5:302019-08-20T10:25:16+5:30

चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 ने आज आपल्या प्रवासातील अजून एक मोठा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे.

Chandrayaan-2 Successfully enters the Moon's orbit, ISRO reports | चांद्रयान -2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, इस्रोने दिली माहिती  

चांद्रयान -2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, इस्रोने दिली माहिती  

googlenewsNext

चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या इस्रोच्याचांद्रयान-2 ने आज आपल्या प्रवासातील अजून एक मोठा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आज सकाळी चांद्रयान -2 यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत दाखल झाले, अशी माहिती इस्रोने ट्विट करून दिली. तसेच याबाबत अधिक माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान थोड्याच वेळात पत्रकार परिषदेमधून देतील, असे सांगण्यात आले आहे. 



22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या चांद्रयान-2 ने 14 ऑगस्ट रोजी पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने प्रयाण केले होते. आता पुढचे काही दिवस चांद्रयान-2 चंद्राभोवती घिरट्या घालणार आहे. या काळामध्ये इस्रोकडून चांद्रयानाच्या कक्षेत पाचवेळा बदल करण्यात येणार आहेत. त्यानंतर अखेरीस हे यान चंद्राच्या ध्रुवावरून जात चंद्रावरील 100 किमी अंतरावरील आपल्या शेवटच्या कक्षेत पोहोचेल. 2 सप्टेंबर रोजी लँडर विक्रम ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्टभागावर लँडर विक्रम उतरेल. 

दरम्यान, बंगळुरूस्थित केंद्रातून या यानाच्या स्थितीवर नजर ठेवली जात आहे. चांद्रयान २ च्या सर्व प्रक्रिया सामान्यपणे पार पडत आहेत, असे इस्रोने सांगितले आहे. आता चांद्रयान - 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्यानंतर चंद्राबाबत आतापर्यंत समोर न आलेल्या बाबींबर प्रकाश पडणार आहे. 

Web Title: Chandrayaan-2 Successfully enters the Moon's orbit, ISRO reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.