Chandrayaan-2 Landing Live Video : इस्रो प्रमुख के. सिवन झाले भावूक; पंतप्रधान मोदींनी दिला धीर

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 10:12 PM2019-09-06T22:12:01+5:302019-09-07T09:28:31+5:30

चांद्रयान 2 मोहिमेतील शेेवटचा टप्पा पार पडताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला आहे. केवळ 2 किमी अंतर दूर असताना इस्रोचा ...

Chandrayaan 2 Mission Vikram Rover Moon Landing Live Updates: India on the cusp of Moon landing | Chandrayaan-2 Landing Live Video : इस्रो प्रमुख के. सिवन झाले भावूक; पंतप्रधान मोदींनी दिला धीर

Chandrayaan-2 Landing Live Video : इस्रो प्रमुख के. सिवन झाले भावूक; पंतप्रधान मोदींनी दिला धीर

Next

चांद्रयान 2 मोहिमेतील शेेवटचा टप्पा पार पडताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला आहे. केवळ 2 किमी अंतर दूर असताना इस्रोचा संपर्क तुटला आहे. त्यानंतर, पंतप्रधान नरेद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविलं आहे.  होप फॉर द बेस्ट... असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. मी पाहिलंय, जेव्हा संपर्क तुटला तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते. पण, तुम्ही जे केलंय ते खूप मोठं काम आहे.
देशाची, विज्ञानाची आणि मानवजातीची सेवा केली. मी तुमच्या पाठिशी असून संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असेही मोदींनी म्हटले. 

पाहा व्हिडीओ -

या मोहिमेतील 'विक्रम' लँडरचा चंद्रापर्यंतचा शेवटचा 35 किमीचा प्रवास अत्यंत खडतर टप्पा असणार आहे. 'चांद्रयान-2'च्या लँडर 'विक्रम'चं जर सॉफ्ट लँडिंग यशस्वी  झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश असणार आहे. तसंच, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश असणार आहे. त्यामुळं 'इस्रो' याठिकाणी 'चांद्रयान-2' चं लँडिंग करुन 'विक्रम' करणार आहे.

LIVE

Get Latest Updates

09:14 AM

इस्रो प्रमुख के. सिवन यांना अश्रू अनावर

08:52 AM

निराश होऊ नका, आम्हाला तुमचा अभिमान आहे, संपूर्ण देश इस्रोच्या पाठीशी - पंतप्रधान मोदी

08:40 AM

 चांद्रयान 2 चा प्रवास शानदार - नरेंद्र मोदी

08:36 AM

विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही - नरेंद्र मोदी

08:36 AM

अंतराळ क्षेत्रात भारत अग्रणी आहे, वैज्ञानिकांचं अतुलनीय योगदान - नरेंद्र मोदी

08:34 AM

चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता - नरेंद्र मोदी

08:34 AM

चांगल्या कामासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न एक नवीन धडा शिकवतो - नरेंद्र मोदी

08:33 AM

आम्हाला तुमचा गर्व आहे, देश तुमच्यासोबत - नरेंद्र मोदी

08:30 AM

लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल, आपला इतिहास उज्वल आहे, हार मानण्याची आपली संस्कृती नाही - नरेंद्र मोदी

08:28 AM

देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही - नरेंद्र मोदी

08:23 AM

इस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे - नरेंद्र मोदी

08:20 AM

अडचणींमुळे आमचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे - नरेंद्र मोदी

08:19 AM

रात्रंदिवस काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं कौतुक आहे - नरेंद्र मोदी

08:18 AM

 देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे - नरेंद्र मोदी
 

08:18 AM

चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून दृढ झाली - नरेंद्र मोदी
 

08:16 AM

चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून दृढ झाली - नरेंद्र मोदी

08:13 AM

मी तुमची मनस्थिती जाणतो, निराश होऊ नका - नरेंद्र मोदी

08:12 AM

मी तुमची मनस्थिती जाणतो, निराश होऊ नका - नरेंद्र मोदी

08:11 AM

पंतप्रधान मोदी यांचं देशाला संबोधन

08:09 AM

बंगळुरू : पंतप्रधान मोदी यांचं देशाला संबोधन

08:08 AM

बंगळुरू : विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा कायम, डेटा विश्लेषणाचं काम सुरू
 

07:58 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

07:47 AM

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी आठ वाजता देशाला संबोधित करणार

02:25 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे तोंड भरुन कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोप्रमुखांची पाठ थोपटली. तसेच इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे तोंडभरुन कौतुक केलं. विक्रम लँडिंरशी संपर्क तुटल्यानंतर मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. तसेच, जीवनात चढउतार येतच असतात, देशाला तुमच्यावर गर्व आहे, असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले आहे. चांगल्या पहाटेची आशा करुया, असेही मोदी म्हणाले.  

02:14 AM

रफ ब्रेकींग यशस्वी झाले असून फाईन ब्रेकींग सुरू झाले आहे.

सध्या विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला असून संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून होत आहे. 

01:25 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथील इस्रो कार्यालयात दाखल

01:13 AM

चांद्रयान 2 च्या लँडिंगचा थेट प्रक्षेपण, पाहा व्हिडीओ

10:31 PM

तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार 

- इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल. 
- प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल. 
- दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल.

10:31 PM

नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं आवाहन केलंय.

10:22 PM

'प्रतीक्षा मध्यरात्रीची, लँडिंग करुन इतिहास घडवणार'

आम्ही चांद्रयानाचे लँडिंग अशा ठिकाणी उतरवत आहेत. ज्याठिकाणी याआधी कोणीही गेले नाही. आम्हाला सॉफ्ट लँडिंगबाबत विश्वास असून रात्रीची वाट पाहत आहोत, असे इस्त्रोचे प्रमुख के. सीवन यांनी शुक्रवारी सांगितले. 

10:17 PM

10:14 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरुत दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-2 चं लँडिंग इस्रोमध्ये जाऊन शास्त्रज्ञांसमवेत पाहणार आहेत. 

Web Title: Chandrayaan 2 Mission Vikram Rover Moon Landing Live Updates: India on the cusp of Moon landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.