शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

भारताच्या 'चांद्रयान-2' मोहीमेचा खर्च 'या' हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 10:52 AM

येत्या एप्रिलमध्ये इस्रोचे चांद्रयान २ अवकाशभरारी घेणार आहे.

नवी दिल्ली: अगदी कमी खर्चात उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या प्रक्षेपकांच्या निर्मितीनंतर भारतीय संशोधकांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. भारताच्या आगामी चांद्रयान-2 मोहीमेचा खर्च हॉलिवूडच्या 'इंटस्टेलर' या चित्रपटापेक्षाही कमी असल्याची बाब समोर आली आहे. इंटरस्टेरल या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 1,062 कोटींचा खर्च आला होता. मात्र, भारताची चांद्रयान-2 मोहीम अवघ्या 800 कोटींमध्ये पार पडणार आहे. यापूर्वीची भारताची 2013 मधील मंगळयान मोहीमही कमी खर्चामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली होती. या मोहीमेसाठी 470 कोटी रूपये खर्च झाला होता. त्यावेळी प्रदर्शित झालेल्या 'ग्रॅव्हिटी' या हॉलिवूडपटाचे बजेटही ( 644 कोटी) या मोहीमेपेक्षा जास्त होते. भारतीय अंतराळ अवकाश संस्थेने (इस्त्रो) इतक्या कमी खर्चात मोहीम पार पाडल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे खूप कौतुकही झाले होते. याबद्दल खुलासा करताना 'इस्त्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी सांगितले की, प्रक्रिया अत्यंत सोपी बनवणे, मोठ्या क्लिष्ट सिस्टीमला लहान आणि साधं बनवणं, क्वालिटी कंट्रोल आणि आऊटपूट वाढवणं यामुळे आपल्या मोहीमा कमी खर्चातही यशस्वी होत आहेत. आम्ही अंतराळयान किंवा रॉकेट विकसित करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवतो, ज्यामुळे उत्पादनाची नासाडी थांबते आणि खर्च कमी होतो.येत्या एप्रिलमध्ये इस्रोचे चांद्रयान २ अवकाशभरारी घेणार आहे. या मोहिमेंतर्गत चंद्रावर सॉफ्टलँडिंगद्वारे रोव्हर वॉक होणार आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धावरील जागा या मिशनसाठी निवडण्यात आली आहे. या भागात खूप मोठे आणि लक्षावधी वर्ष जुने खडक आहेत. त्यातून आपल्याला चंद्राची अधिक माहिती मिळणार असल्याचे सिवन यांनी सांगितले. यापूर्वी नासाचे अपोलो आणि रशियाचे लुना अवकाश यान चांद्रभूमीवर उतरले होते. पण या मोहिमांमध्ये रोव्हर चंद्रावर मध्यभागी उतरवण्यात आला होता. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो