Chandrayaan-2: ISRO's Chandrayaan-2 Launch Successfully from Sriharikota | Breaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी
Breaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी

श्रीहरीकोटा :  130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्याचांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. गेल्या रविवारी मध्यरात्री नियोजित असलेले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आल्याने इस्रोच्या शास्रज्ञांसह देशवासीयांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र आज हे यान नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने  दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. जवळपास 7500 लोकांनी ऑनलाईन बुकिंग केले होते. यासाठी इस्त्रोने 10000 लोक बसू शकतील अशी गॅलरी बनविली होती. दरम्यान, आजच्या यशस्वी उड्डाणानंतर चांद्रयान-2 काही दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणास असून, त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. तसेच 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान चंद्रावर उतरेल.


 
चांद्रयान 2 ला पृथ्वीच्या कक्षेत पोहोचविण्यासाठी इस्त्रोने शक्तीशाली रॉकेट जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल मार्क 3 (जीएसएलव्ही-एमके 3) वापर केला. या रॉकेटला स्थानिक प्रसारमाध्यमांनी 'बाहुबली' असे नवा दिले आहे. या रॉकेटचे वजन 640 टन असून रॉकेटची किंमत 375 कोटी रुपये आहे. या रॉकेटने 3.8 टन वजनाच्या चांद्रयान-2 या यानाला घेऊन उड्डाण केले. या यानाच्या निर्मितीचा खर्च 6.3 कोटी रुपये आहे. हे यान वेगवेगळे प्रवासाचे टप्पे पार करत 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरणार आहे. आतपर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनीच यान चंद्रावर नेले आहे.2008 मध्ये भारताने चांद्रयान-1 ही मोहीम आखली होती. हे यान निरीक्षण करणारे होते. या यानाने 10 महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. चंद्रावर पाणी असल्याचा शोध याच मोहिमेमध्ये लागला होता.
1) पृथ्वीच्या कक्षेत जाण्यासाठी लागणारा वेळ एक मिनिटांनी वाढविला 
22 जुलै : ‘चांद्रयान-2’ आता 974.30 सेकंदात (जवळपास 16.23 मिनिट) पृथ्वीपासून 181.65 किमीच्या उंचीवर पोहोचेल. 
15 जुलै : ‘चांद्रयान-2’ आधी 973.70 सेकंदात (जवळपास 16.22 मिनिट) पृथ्वीपासून 181.61 किमीच्या उंचीवर पोहोचणार होते.
  
2) पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार चक्करमध्ये बदल, एपोजीमध्ये 60.4 किमीचे अंतर
22 जुलै : ‘चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार कक्षात घिरट्या घालेल. याचा पेरिजी (पृथ्वीपासून कमी अंतर) 170 किमी आणि एपोजी (पृथ्वीपासून जास्त अंतर) 39120 किमी असणार आहे. 
15 जुलै : ‘चांद्रयान-2’ जर लाँच झाले असते तर याचा पेरिजी 170.06 किमी आणि एपोजी 39059.60 किमी होणार होता. म्हणजेच एपोजीमध्ये 60.4 किमी अंतर आणले असते. तसेच, पृथ्वीच्या चारी बाजूने घालणाऱ्या घिरट्या कमी केल्या असत्या. 

3) चंद्रावर पोहोचण्याच्या कालावधीत 6 दिवसांनी कमी  
‘चांद्रयान-2’ जर 15 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले झाले असते तर 6 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले असते. मात्र. आज 22 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच, ‘चांद्रयान-2’ हे 6 सप्टेंबरलाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे. ‘चांद्रयान-2’ आता पृथ्वीच्या चारी बाजूने 5 च्याऐवजी 4 घिरट्या घालणार आहे.  

4) वेलोसिटीमध्ये 1.12 मीटर प्रति सेकंद वाढ
‘चांद्रयान-2’ चे आज प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्रावर जास्त वेगात जाणार आहे. आता अंतराळात याचा वेग 10305.78  मीटर प्रति सेंकद असणार आहे. जर, 15 जुलैला प्रक्षेपण झाले असते तर याचा वेग 10,304.66 मीटर प्रति सेकंद असता. म्हणजेच, आज होणाऱ्या प्रक्षेपणात ‘चांद्रयान-2’ चा वेग 1.12 मीटर प्रति सेकंद वाढविण्यात आला आहे.  


English summary :
Chandrayaan-2 Launch Update: Chandrayaan-2 made a successful launch from Satish Dhawan space station at Sriharikota with the help of a 'Baahubali' rocket at 2:00 pm. Thousands of people from all over the country came to see this flight. About 7500 people had made online bookings. For this reason, ISRO had built a gallery that could accommodate 10,000 people


Web Title: Chandrayaan-2: ISRO's Chandrayaan-2 Launch Successfully from Sriharikota
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.