नवी दिल्ली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे दिल्लीत अचानकपणे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीत आल्याचे सांगण्यात आले.प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर ते पहिल्यांदा दिल्लीत आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. ते चंद्रपूर येथे दौऱ्यावर असताना त्यांना दिल्लीला बोलाविल्याचा संदेश मिळाला. त्यानंतर ते तत्काळ दिल्लीत दाखल झाले. बावनकुळे यांचा हा दौरा गुप्त ठेवण्यात आला होता.प्रसारमाध्यमांपासून त्यांनी दूर राहणे पसंत केले. येत्या ५ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर जाणार असल्याने बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा आहे. बावनकुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटणार असल्याचे सांगण्यात आले.
बावनकुळे दिल्लीत, पंतप्रधानांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 11:59 IST