शहरं
Join us  
Trending Stories
1
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
2
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
3
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
4
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
5
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
6
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
7
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
8
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
9
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
10
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
11
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
12
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
14
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
15
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
16
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
17
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
18
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
19
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
20
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम

"नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढणार", चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:10 IST

"मी गेली चार दशके राजकारणात आहे. आज संपूर्ण जगात देशाची शान वाढली, त्याचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना जाते. भारताकडे मोदीजींच्या रुपाने योग्य वेळी योग्य नेता आला आहे."

Narendra Modi Lok Sabha : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी(दि.7) दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक झाली आणि त्यात सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेतेपदी निवड केली. यावेळी एनडीएतील दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandra Babu Naidu) यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. यावेळी नायडूंनी मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामगिरीचे कौतुक केले. तसेच, देश लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी चंद्राबाबू म्हणाले की, "गेल्या 10 वर्षांत भारतात मोठा बदल झाला असून भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा वेग असाच सुरू राहील आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत यावेळी तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. नरेंद्र मोदीं नेतृत्वाखाली एनडीए सरकारने गेल्या 10 वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मोदींच्या नेतृत्वात देश जागतिक शक्तीस्थान बनला आहे."

ते पुढे म्हणतात, "मी गेली चार दशके राजकारणात आहे. आज संपूर्ण जगात देशाची शान वाढली आहे, त्याचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना जाते. आज भारताकडे मोदीजींच्या रुपाने योग्य वेळी योग्य नेता आला आहे. भारतासाठी ही एक उत्तम संधी आहे, ही संधी पुन्हा येणार नाही. येत्या काही दिवसात भारत जागतिक पातळीवर आघाडीवर असेल. एनडीएच्या संसदीय पक्षाचा नेता म्हणून मोदींच्या नावाला माझा पाठिंबा आहे."

पाच वर्षे तुमच्यासोबत राहू-नितीश कुमार यावेळी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू प्रमुख नितीश कुमार म्हणाले की, जेडीयूचा पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पूर्ण पाठिंबा आहे. आमचा पक्ष पूर्ण 5 वर्षे नरेंद्र मोदी यांच्यासोबत असेल. पुढच्या वेळी आपण जास्त बहुमत घेऊन येऊ. आज हा आनंदाचा क्षण आहे. दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि आता पुन्हा पंतप्रधान होत आहेत. त्यांनी सगळ्या देशाची सेवा केली आहे. आता पूर्ण विश्वास आहे की, राज्यांचे जे काही बाकी आहे ते पूर्ण करतील. आम्हाला तर वाटतंय की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा याल तेव्हा सगळेच पराभूत होतील. आम्ही सगळे तुमच्या नेतृत्वात काम करू, असे नितीश कुमार म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू