शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Punjabi Singer Diljaan Died : लोकप्रिय गायक दिलजानचा भीषण अपघातात मृत्यू; 2 एप्रिलला होणार होतं नवं गाणं रिलीज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 13:10 IST

Punjabi Singer Diljaan Died : पंजाबी इंडस्ट्रीमधील अत्यंत लोकप्रिय गायक दिलजानचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - पंजाबच्या अमृतसरमध्ये एक भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. या अपघातातपंजाबी इंडस्ट्रीमधील अत्यंत लोकप्रिय गायक दिलजानचा (Punjabi Singer Diljaan Died) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी अमृतसर येथून करतारपूरला जात असताना हा अपघात झाला आहे. जंडियाला गुरुजवळ ही दुर्घटना घडली. भीषण अपघातात दिलजानचा जागीच मृत्यू झाला आहे. 2 एप्रिल रोजी दिलजानचं एक नवं गाणं रिलीज होणार होतं. पण ते रिलीज होण्यापूर्वी दिलजानचं निधन झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 3.45 सुमारास अमृतसर-जालंधर जोटी रोडवर जंडियाला गुरू पुलाजवळ दिलजानचा अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी दिलजानला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. दिलजानचा अपघात नेमका कसा झाला? त्याची गाडी दुभाजकाला कशी धडकली? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

गायक सुकशिंदर शिंदा यांनी दिलजानचे निधन झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. "आज सकाळी अतिशय दु:खद बातमी मला कळाली. संगीत क्षेत्राला मोठे नुकसान झालं आहे. दिलजानचे निधन झाले" असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. दोन एप्रिल रोजी त्याचं नवीन गाणं रिलीज होणार होते. पण ते रिलीज होण्यापूर्वी दिलजानचे निधन झालं. गाण्याबाबतच एक मीटिंग करण्यासाठी तो अमृतसर येथे गेला होता. मात्र परतताना हा भीषण अपघात झाला आहे. दिलजानच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPunjabपंजाब