शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

गोंधळात गोंधळ ! पार्सल पंजाबमध्ये जाण्याऐवजी पोहोचलं चीनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 3:24 PM

'...जाते थे जापान पहुँच गए चीन समझ गए ना', सिनेमाच्या गाण्यातील या ओळींशी मिळता-जुळता किस्सा चंदिगडमधील एका महिलेसोबत वास्तविक आयुष्यात घडला आहे. केवळ एक अक्षर समजण्यास चूक झाली म्हणून जे पार्सल पंजाबमधील एका गावात पोहोचायचे होते, ते तेथे न जाता चक्क चीनमध्ये पाठवण्यात आले. 

ठळक मुद्देचंदिगडमधील महिलेनं आईसाठी पाठवलं होतं औषधांचं पार्सन चैना आणि चीन नावावरुन गोंधळपोस्ट ऑफिसकडून दंड भरण्याचे आदेश

चंदिगड - '...जाते थे जापान पहुँच गए चीन समझ गए ना', सिनेमाच्या गाण्यातील या ओळींशी मिळता-जुळता किस्सा चंदिगडमधील एका महिलेसोबत वास्तविक आयुष्यात घडला आहे. केवळ एक अक्षर समजण्यास चूक झाली म्हणून जे पार्सल पंजाबमधील एका गावात पोहोचायचे होते, ते तेथे न जाता चक्क चीनमध्ये पाठवण्यात आले. 

चैना (Chaina) आणि चीन (China) या नावांमुळे गोंधळ चंदिगडमधील एका महिलेनं फरीदकोटमध्ये आपल्या आईसाठी ब्लड प्रेशरच्या औषधांचे पार्सल पाठवले होते. पण गावाचे नाव समजण्यास चूक झाल्याने ते पार्सल चक्क चीनमध्ये पोहोचले. मनिमाजरा येथील रहिवासी बलविंदर कौर यांच्या तक्रारीनुसार जिल्हा ग्राहक विवाद फोरमने सेक्टर 17 च्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घडल्या प्रकारची चौकशी केली. पोस्ट ऑफिसने सांगितले की, पत्त्यामध्ये फरीदकोट जिल्ह्यातील जायतो तालुक्यातील चैना गावाचे नाव नमूद करण्यात आले होते, या गावाच्या नावास चुकीने चीन (China) असे समजले गेले. 

याबाबत बलविंदर कौरने सांगितले की, त्यांनी पोस्ट ऑफिसच्या राजभवन शाखेतून 18 जानेवारीला रजिस्टर्ड पोस्ट पाठवले होते. पण हे पार्सल चंदिगडहून दिल्लीला गेले आणि तेथून चीनमध्ये पोहोचले. 19 जानेवारी ते  27 जानेवारीपर्यंत बीजिंगमध्ये राहिल्यानंतर पार्सल 31 जानेवारीला गावात पोहोचले. यास पोस्ट ऑफिसचे अधिकारी जबाबदार आहेत.  

तर दुसरीकडे, पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौर यांनी पार्सलवर Delivery Chaina असे लिहून गोंधळ निर्माण केला. आमच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. शिवाय, पोस्ट ऑफिस अॅक्टअंतर्गत केंद्र सरकार किंवा कोणताही पोस्टल अधिकारी पोस्टाद्वारे करण्यात येणाऱ्या पार्सल डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्यास किंवा पार्सल हरवल्यास जबाबदार राहणार नाही. 

ग्राहक फोरमकडून दंड भरण्याचे आदेश ग्राहक फोरमने सांगितले की, 'पोस्ट ऑफिसने आरोप फेटाळून लावत तक्रारकर्त्यालाच चुकीसाठी जबाबदार ठरवले. पण संबंधित चूक पोस्ट ऑफिसकडून झाली आहे. यासाठी पोस्ट ऑफिसला दंड म्हणून पाच हजार रुपये महिलेला द्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :chinaचीनPunjabपंजाब