गोंधळात गोंधळ ! पार्सल पंजाबमध्ये जाण्याऐवजी पोहोचलं चीनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 15:41 IST2019-02-13T15:24:07+5:302019-02-13T15:41:43+5:30
'...जाते थे जापान पहुँच गए चीन समझ गए ना', सिनेमाच्या गाण्यातील या ओळींशी मिळता-जुळता किस्सा चंदिगडमधील एका महिलेसोबत वास्तविक आयुष्यात घडला आहे. केवळ एक अक्षर समजण्यास चूक झाली म्हणून जे पार्सल पंजाबमधील एका गावात पोहोचायचे होते, ते तेथे न जाता चक्क चीनमध्ये पाठवण्यात आले.

गोंधळात गोंधळ ! पार्सल पंजाबमध्ये जाण्याऐवजी पोहोचलं चीनमध्ये
चंदिगड - '...जाते थे जापान पहुँच गए चीन समझ गए ना', सिनेमाच्या गाण्यातील या ओळींशी मिळता-जुळता किस्सा चंदिगडमधील एका महिलेसोबत वास्तविक आयुष्यात घडला आहे. केवळ एक अक्षर समजण्यास चूक झाली म्हणून जे पार्सल पंजाबमधील एका गावात पोहोचायचे होते, ते तेथे न जाता चक्क चीनमध्ये पाठवण्यात आले.
चैना (Chaina) आणि चीन (China) या नावांमुळे गोंधळ
चंदिगडमधील एका महिलेनं फरीदकोटमध्ये आपल्या आईसाठी ब्लड प्रेशरच्या औषधांचे पार्सल पाठवले होते. पण गावाचे नाव समजण्यास चूक झाल्याने ते पार्सल चक्क चीनमध्ये पोहोचले. मनिमाजरा येथील रहिवासी बलविंदर कौर यांच्या तक्रारीनुसार जिल्हा ग्राहक विवाद फोरमने सेक्टर 17 च्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घडल्या प्रकारची चौकशी केली. पोस्ट ऑफिसने सांगितले की, पत्त्यामध्ये फरीदकोट जिल्ह्यातील जायतो तालुक्यातील चैना गावाचे नाव नमूद करण्यात आले होते, या गावाच्या नावास चुकीने चीन (China) असे समजले गेले.
याबाबत बलविंदर कौरने सांगितले की, त्यांनी पोस्ट ऑफिसच्या राजभवन शाखेतून 18 जानेवारीला रजिस्टर्ड पोस्ट पाठवले होते. पण हे पार्सल चंदिगडहून दिल्लीला गेले आणि तेथून चीनमध्ये पोहोचले. 19 जानेवारी ते 27 जानेवारीपर्यंत बीजिंगमध्ये राहिल्यानंतर पार्सल 31 जानेवारीला गावात पोहोचले. यास पोस्ट ऑफिसचे अधिकारी जबाबदार आहेत.
तर दुसरीकडे, पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौर यांनी पार्सलवर Delivery Chaina असे लिहून गोंधळ निर्माण केला. आमच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. शिवाय, पोस्ट ऑफिस अॅक्टअंतर्गत केंद्र सरकार किंवा कोणताही पोस्टल अधिकारी पोस्टाद्वारे करण्यात येणाऱ्या पार्सल डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्यास किंवा पार्सल हरवल्यास जबाबदार राहणार नाही.
ग्राहक फोरमकडून दंड भरण्याचे आदेश
ग्राहक फोरमने सांगितले की, 'पोस्ट ऑफिसने आरोप फेटाळून लावत तक्रारकर्त्यालाच चुकीसाठी जबाबदार ठरवले. पण संबंधित चूक पोस्ट ऑफिसकडून झाली आहे. यासाठी पोस्ट ऑफिसला दंड म्हणून पाच हजार रुपये महिलेला द्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.