शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक! आळस दिला अन् जमिनीवर कोसळला; 33 वर्षीय बॉडीबिल्डरचे अकाली निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 14:27 IST

Hear Attack Death : राम राणा नावाच्या बॉडीबिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय आहे.

Hear Attack Death : वर्कआउट(व्यायाम) किंवा एखादं काम करताना अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं (Cardiac Arrest) मृत्यू होण्याच्या घटना देशात वाढत आहेत. चंदीगडमधील दादू माजरा परिसरात असाच एक प्रकार समोर आला आहे. एका 33 वर्षीय तरुण बॉडीबिल्डरचा आळस देताना मृत्यू झाला. राम राणा असे या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम राणा त्याच्या मित्रांसोबत उभा होता, यावेळी त्यानं हात पसरवून आळस दिला अन् कोसळला. मित्रांना वाटलं तो स्ट्रेचिंग करतोय, पण काही वेळानंतर त्याच बोलणं थांबलं. यानंतर मित्रांनी त्याला चंदीगडच्या सेक्टर 16, जीएमएच हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. राम राणाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

राम राणाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्याला कोणताही आजार नव्हता. तो एकदम निरोगी होता आणि रोज जिममध्ये व्यायाम करायचा. त्याला कोणत्याही प्रकारचे वाईट व्यसनही नव्हते. अंमली पदार्थांपासून तर तो दूरच राहायचा. इतकच नाही, तर तो बाहेरचं अन्नही खात नव्हता. राम राणा यांना 11 आणि 3 वर्षांची दोन मुलं आहेत.

काँग्रेस खासदाराचा मृत्यूदरम्यान, गेल्या शनिवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेस खासदार चौधरी संतोख सिंग (76) हेही अचानक जमिनीवर पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. संतोख सिंग यांनाही कुठलाच आजार नव्हता. चंदीगड पीजीआयचे एचओडी (इंटर्नल मेडिसिन) प्रा. संजय जैन म्हणतात की, अशा प्रकरणांमध्ये कार्डियाक ऍरिथमियाची शक्यता असते. म्हणजेच हृदयाच्या गतीमध्ये अनियमितता किंवा अचानक हृदयविकाराचा झटका येतो. अनेक वेळा लवकर पोस्टमॉर्टम केल्यावर हृदयविकाराचा झटकाही आढळत नाही. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यूbodybuildingशरीरसौष्ठव