विदर्भ, मराठवाडयात गारपिटीची शक्यता

By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:02+5:302015-03-08T00:31:02+5:30

पुणे : राज्यावर अवकाळी पावसाचे सावट पुन्हा गडद झाले असून पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Chances of hail in Vidarbha and Marathwada | विदर्भ, मराठवाडयात गारपिटीची शक्यता

विदर्भ, मराठवाडयात गारपिटीची शक्यता

णे : राज्यावर अवकाळी पावसाचे सावट पुन्हा गडद झाले असून पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यात कोठेही पाऊस पडल्याची नोंद झालेली नाही. अरबी समुद्रावर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानपासून राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा प˜ा, लक्षद्वीप ते मालदीवपर्यंत हवेचा कमी दाबाचा प˜ा आणि आसाम राज्यावर हवेचा कमी दाबाचा प˜ा सक्रीय आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे ओढले जात आहेत. त्यामुळे राज्यात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.
शनिवारी राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल आणि कमान तापमान सरासरीच्या खालीच होते. अहमदनगरमध्ये सर्वात कमी ११.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.५, जळगाव ३३.५, कोल्हापूर ३४, महाबळेश्वर २८.९, मालेगाव ३५.२, नाशिक ३३, सांगली ३५, सातारा ३४.१, सोलापूर ३६.४, मुंबई ३२.४, अलिबाग ३९.८, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३०, उस्मानाबाद ३५.१, औरंगाबाद ३२.७, परभणी ३५, नांदेड ३६.५, अकोला ३३.८, अमरावती ३१.४, बुलडाणा ३१.८, ब्रम्हपूरी ३५.१, चंद्रपूर ३५, नागपूर ३३.७, वर्धा ३४.५, यवतमाळ ३२.२. (प्रतिनिधी)

Web Title: Chances of hail in Vidarbha and Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.