शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चंपाई सोरेन यांनी दिला राजीनामा; JMM चे संस्थापक शिबू सोरेन यांना पत्रातून व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 21:21 IST

Champai Soren Resigns: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

Champai Soren News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चचे (JMM) दिग्गज नेते चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दिल्लीहून रांचीला पोहोचल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. आता ते 30 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. चंपाई सोरेन यांच्यासोबत त्यांचा मुलगा बाबुलाल सोरेनदेखील भाजपमध्ये सामील होणार आहेत.

'जेएमएमची दिशा चुकली'पक्षाचे संस्थापक शिबू सोरेन यांना पाठविलेल्या राजीनाम्याच्या पत्रात चंपाई सोरेन लिहितात की, "मला पक्षाची सध्याची कार्यशैली आणि धोरणांमुळे पक्ष सोडतोय. मला हे सांगाता खुप दुःख होतंय की, तुमच्या नेतृत्वात ज्या पक्षाचे स्वप्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिले होते, ज्या पक्षासाठी आम्ही आहोरात्र काम केले, तो पक्ष आता पूर्वीसारखा राहिला नाही. पक्षाची दिशा चुकली आहे."

'हा निर्णय घेताना खुप वेदना होत आहेत'"जेएमएम माझ्यासाठी एका कुटूंबासारखा होता. मला पक्ष सोडावा लागेल, असा विचार स्वप्नातही आला नव्हता. परंतु गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे मला हा कठीण निर्णय घ्यावा लागतोय. तुमच्या आरोग्यामुळे तुम्ही सक्रिय राजकारणापासून दूर आहात आणि तुमच्याशिवाय पक्षात असे कोणीही नाही, ज्यांच्याकडे आम्ही आमचे दु: ख सांगू शकतो. यामुळेच मी झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे. तुमच्या सानिध्यात झारखंड चळवळीदरम्यान आणि त्यानंतर खुप काही शिकायला मिळाले. तुम्ही नेहमी माझे मार्गदर्शक राहाल," असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

भाजपमधील कोणते पद मिळणार?भाजपमध्ये चंपाई सोरेन यांची भूमिका काय असेल किंवा त्यांना कोणते पद दिले जाईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना सांगितले होते की, भाजपमध्ये जे पद दिले जाईल, त्या पदावर काम करायला तयार असेन. मी कुठल्याही अटीशर्तीशिवाय भाजपामध्ये सामील होणार आहे. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी नवीन पक्ष स्थापनेचे संकेत दिले होते, पण नंतर आपला निर्णय बदलून अचानक भाजपमध्ये जाण्याचे ठरवले.

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाBJPभाजपा