शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

ममतांना पाणी पाजण्याचे आव्हान दिलेले, कर्नाटकात तेजस्वी सूर्याच 'आऊट' झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 18:07 IST

बंगालच्या निवडणुकीत ममतांच्या चिंता वाढविल्या होत्या. परंतू कर्नाटकात त्यांना विचारात घेतले नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

देशातील सर्वात तरुण खासदार म्हणून चर्चेत आलेले आणि भाजपात वेगळी ओळख निर्माण करणारे भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय़ अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांना भाजपानेच धक्का दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीतून तेजस्वी यांना वगळण्यात आले आहे. अशाप्रकारे स्वत: च्याच राज्यातून नाव गायब होणे हे तेजस्वींसाठी पक्षाने दिलेला एक मोठा संदेश असल्याचे मानले जात आहे. 

काही महिन्यांपूर्वी तेजस्वी सूर्या यांनी हवेत असलेल्या विमानाचा इमरजन्सी दरवाजा उघडण्याची चूक केली होती. यामुळे विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. यामुळे कदाचित पक्षाने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून दूर ठेवले असावे असा कयास बांधला जात आहे. याच तेजस्वी यांनी पश्चिम बंगालमध्ये ममतांना पाणी पाजण्याचे ठरविले होते. बंगालच्या निवडणुकीत ममतांच्या चिंता वाढविल्या होत्या. परंतू कर्नाटकात त्यांना विचारात घेतले नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

काँग्रेसला आयतीच संधी मिळाली...तेजस्वी सूर्या यांना प्रचारकांच्या यादीत न घेतल्याने काँग्रेसला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. त्यांच्याच घरची ही परिस्थिती असताना त्यांचे पक्षात काय महत्त्व उरले आहे, हे समजून घेतले पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. तर काँग्रेसला ज्ञान वाटत फिरणाऱ्या नफरती चिंटूला भाजपाने  ‘इमरजेंसी exit’ दाखविल्याचे, काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे.

भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी तयार पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मजबूत टीमचा समावेश आहे. पक्षाने जाहीर केलेल्या नेत्यांच्या यादीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि प्रल्हाद जोशी यांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय मध्य प्रदेश आणि आसामचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्वा सरमा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सीएम बसवराज बोम्मई, कर्नाटक भाजपचे प्रबळ नेते बीएस येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री डीव्ही सदानंद गौडा, कर्नाटकातील काही मंत्री आणि राज्यातील पक्षाच्या नेत्यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

टॅग्स :Tejasvi Suryaतेजस्वी सूर्याBJPभाजपाKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण