सुहाग यांच्या निवडीला आव्हान; जुलैमध्ये सुनावणी

By Admin | Updated: June 20, 2014 02:54 IST2014-06-20T02:54:33+5:302014-06-20T02:54:33+5:30

लष्कराचे उपप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांच्या लष्करप्रमुख पदावरील नियोजित नियुक्तीला आव्हान देणा:या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय जुलैच्या दुस:या आठवडय़ात सुनावणी करणार आह़े

Challenge of selection of Suhag; Hearing in July | सुहाग यांच्या निवडीला आव्हान; जुलैमध्ये सुनावणी

सुहाग यांच्या निवडीला आव्हान; जुलैमध्ये सुनावणी

>नवी दिल्ली : लष्कराचे उपप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांच्या लष्करप्रमुख पदावरील नियोजित नियुक्तीला आव्हान देणा:या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय जुलैच्या दुस:या आठवडय़ात सुनावणी करणार आह़े
न्या़ विक्रमजित सेन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी सप्टेंबरऐवजी जुलैत करण्यास होकार दर्शवला़ लेफ्टनंट जनरल सुहाग 1 ऑगस्टला लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारतील़ तत्पूर्वी, त्यांच्या नियुक्तीसंदर्भातील वाद निकाली निघणो गरजेचे आहे, हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला़ लेफ्टनंट जनरल रवी दस्ताने यांनी सुहाग यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आह़े सुहाग यांच्या निवडीत कथितरीत्या पक्षपात झाल्याचा त्यांचा आरोप आह़े (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Challenge of selection of Suhag; Hearing in July