चिंतनानंतर चैतन्य

By Admin | Updated: June 29, 2014 02:52 IST2014-06-29T02:52:04+5:302014-06-29T02:52:04+5:30

लोकसभेच्या दारुण पराभवाविषयी केंद्रीय स्तरावर वस्तुनिष्ठ चिंतन केल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रासाठी नवी संरचना आखल्याने राज्यातील पक्ष कार्यकत्र्यामध्ये चैतन्य आले आहे.

Chaitanya after meditation | चिंतनानंतर चैतन्य

चिंतनानंतर चैतन्य

>काँग्रेसची विधानसभेची तयारी : उमेदवारांची यादी 15 दिवसांत
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
लोकसभेच्या दारुण पराभवाविषयी केंद्रीय स्तरावर वस्तुनिष्ठ चिंतन केल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रासाठी नवी संरचना आखल्याने राज्यातील पक्ष कार्यकत्र्यामध्ये चैतन्य आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 15 दिवसांत संभाव्य उमेदवारांची यादी करण्यात येणार आहे. ती तीन टप्प्यांत असेल, विद्यमान आमदारांपैकी खात्रीने विजयी होणारा, विजयाची शक्यता असणारा तसेच नवीन उमेदवार असा तो क्रम असेल. पराभवाच्या पंचनाम्यात अडकून न पडता नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे स्पष्ट संकेत शनिवारी मिळाले.  
नव्या जोमाने विधानसभेला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसने निर्णयशैलीबद्दल स्पष्ट धोरण स्वीकारण्याचे ठरविले आहे. त्याचाच भाग म्हणून कोणाला तिकीट द्यायचे याचा घोळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत चालणार नाही. तातडीने उमेदवार निश्चित केले जातील व त्यांना कामाला लागण्याचे आदेशही पक्षातर्फे देण्यात येतील. दिल्लीत शनिवारी काँग्रेसने महाराष्ट्राच्या पराभवाची कारणो शोधण्यासाठी व्यापक बैठक घेतली. पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. अॅन्थनी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यात अनेकांनी पराभवाचे खापर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर फोडल्याची चर्चा राजधानीत होती. पण सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, आता जोमाने कामाला लागण्यावर पक्षाच्या नेतृत्वाने भर दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाने पराभवानंतर तातडीने पक्षांतर्गत अनेक बदल करण्याचा सपाटा लावला होता. आता काँग्रेसनेही वेगवान हालचाली सुरू केल्या असून, प्रत्येक मतदारसंघात सरकारी योजनांची माहिती पोहोचवणो हा मुख्य भाग असेल. आठ महसूल विभागांचे प्रमुख म्हणून पश्चिम महाराष्ट्रात सुशीलकुमार, कोकणात राणो, विदर्भात मुत्तेमवार, मोघे व वासनिक यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते; तर मराठवाडय़ात अशोक चव्हाण, राजीव सातव, अमित देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविली जाईल, अशी चिन्हे आहेत.  विभागवार समिती 8 सदस्यांची असेल. त्यात एक सदस्य दिल्लीचा असेल. कोकण व पश्चिम महाराष्ट्रासाठीची पहिली बैठक माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत 3 जुलै रोजी होणार आहे. 7 तारखेला विदर्भाची बैठक होईल. या सर्व बैठका मुंबईत होतील, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे.  
 
 
काँग्रेसमधील संभाव्य बदल टळले.!
लोकसभेतील पराभव आमच्या जिव्हारी लागला असून, विधानसभा निवडणूक जिंकायची असेल, तर मोठे संघटनात्मक व प्रशासकीय बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही, असा सूर काँग्रेसच्या पराभूत लोकसभा उमेदवार व काही पदाधिका:यांनी आळवला. तथापि,  पराभवाची राज्यनिहाय कारणमीमांसा या समितीपुढे होत असल्याने 
6 जुलैनंतरच संभाव्य फेरबदलाची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या बदलाच्या चर्चेला सध्या तरी अर्धविराम मिळाला.

Web Title: Chaitanya after meditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.