सीईओ राकेशकुमार यांना अटक
By Admin | Updated: August 19, 2014 01:07 IST2014-08-19T01:07:04+5:302014-08-19T01:07:04+5:30
एका प्रादेशिक चित्रपटाला मंजुरी देण्यासाठी 70 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाचे सीईओ राकेशकुमार यांना सोमवारी सीबीआयने अटक केली.

सीईओ राकेशकुमार यांना अटक
नवी दिल्ली : एका प्रादेशिक चित्रपटाला मंजुरी देण्यासाठी 70 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाचे सीईओ राकेशकुमार यांना सोमवारी सीबीआयने अटक केली. दरम्यान, सीबीआयने सेन्सॉर बोर्डाचा एजंट व बोर्डाच्या सल्लागार मंडळातील एका सदस्यालाही अटक केली. ‘मोर डाऊकी के बिहाव’ या छत्तीसगडी चित्रपटाला प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाचे अधिकृत एजंट असलेल्या श्रीपती मिश्र याने राकेशकुमार यांच्यावतीने 7क् हजारांची लाच मागितली होती. राकेशकुमार यांनी यावर्षी जानेवारीमध्ये सेन्सॉर बोर्ड सीईओपदाचा पदभार स्वीकारला. (प्रतिनिधी)