केंद्र सरकारने एलन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एका औपचारिक नोटीसद्वारे कडक तंबी दिली. एक्सच्या ग्रोक या एआय टूलचा गैरवापर करून महिला आणि मुलांना लक्ष्य करणारी अश्लील आणि आक्षेपार्ह कटेंट तयार केली जात असल्याबद्दल सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली असून, ७२ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, एक्स प्लॅटफॉर्म माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी कायदा, २०००) आणि आयटी नियमांनुसार आपल्या कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरले आहे. विशेषतः ग्रोक एआयद्वारे तयार होणारा अश्लील कंटेंट गोपनीयतेच्या आणि डिजिटल सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे सरकारने नमूद केले आहे.
केंद्र सरकारने एक्सला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सर्व बेकायदेशीर आणि आक्षेपार्ह कंटेंट ताबडतोब काढून टाकण्याचे आणि या प्रक्रियेत सामील असलेल्या दोषी वापरकर्त्यांवर कठोर कारवाई करून ७२ तासांच्या आत 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' मंत्रालयाला सादर करावा, असेही आदेश दिले.
मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर 'एक्स'ने या नियमांचे पालन केले नाही, तर त्यांना माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत मिळणारे कायदेशीर संरक्षण गमवावे लागेल. अशा परिस्थितीत, प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी कंपनीचे अधिकारी थेट फौजदारी कारवाईसाठी पात्र ठरतील.
Web Summary : The government has issued a strict warning to Elon Musk's X regarding obscene content. Concerns arise from Grok AI's misuse, generating inappropriate material targeting women and children. X is ordered to remove illegal content and submit a report within 72 hours.
Web Summary : सरकार ने अश्लील सामग्री को लेकर एलोन मस्क के एक्स को कड़ी चेतावनी दी है। ग्रोक एआई के दुरुपयोग से महिलाओं और बच्चों को लक्षित करने वाली अनुचित सामग्री उत्पन्न होने पर चिंता व्यक्त की गई। एक्स को अवैध सामग्री हटाने और 72 घंटों के भीतर रिपोर्ट जमा करने का आदेश दिया गया है।