शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी सरकारकडून सत्तेचे केंद्रीकरण; राहुल गांधी यांनी केला पुन्हा जबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:04 IST

राहुल गांधी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘अपयशी अंमलबजावणी’च्या ‘केस स्टडीज’साठी ‘एचएसबीसी’मधील भविष्यकालीन विषय : १. कोविड-१९, २. नोटाबंदी, ३. जीएसटी अंमलबजावणी.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने निशाणा साधला आहे. त्यांनी एका टष्ट्वीटमध्ये ‘हॉर्वर्ड बिझनेस स्कूल’मधील (एचएसबीसी) भविष्यकालीन ‘अपयशी अंमलबजावणी’चे तीन विषय म्हणून कोविड-१९ विषाणू साथ, नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणी यांचा उल्लेख केला आहे.राहुल गांधी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘अपयशी अंमलबजावणी’च्या ‘केस स्टडीज’साठी ‘एचएसबीसी’मधील भविष्यकालीन विषय : १. कोविड-१९, २. नोटाबंदी, ३. जीएसटी अंमलबजावणी. राहुल गांधी यांनी आपल्या टष्ट्वीटसोबत नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ जोडला आहे. या व्हिडिओत मोदी म्हणतात की, ‘महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. कोरोनाचे युद्ध आपण २१ दिवसांत जिंकू.’ मोदी भाषण करीत असतानाच व्हिडिओवर भारतातील कोरोना रुग्णांचा आलेख ‘सुपर इम्पोज’ होऊन वर चढत जाताना दिसतो. मोदीच्या भाषणाची क्लिप संपताना हा आलेख कोरोनाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानी आल्याचे दर्शवितो. कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणार असल्याचे सांगत असतानाच मोदी ‘थाळ्या वाजवून, टाळ्या वाजवून, घंटी वाजवून, मेणबत्त्या-दिवे पेटवून अथवा मोबाईलचा लाईट लावून’ असे वक्तव्य करताना दिसतात.कोरोनाविरोधातील लढाईत टाळ्या-थाळ्या वाजविणे आणि दिवे पेटविण्याच्या मोदींच्या आवाहनावर याआधीच चोहोबाजूंनी मोठी टीका झालेली आहे.कोविड-१९ च्या हाताळणीबाबत मोदी सरकारवर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच टीका करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांची तुलना त्यांच्याकडून पाश्चात्त्य देशांशी करण्यात आली. कोरोना संकटाबाबत राहुल गांधी यांनी बुद्धिजीवी नागरिकांशी चर्चा केली आहे. कोविड-१ चे निमित्त साधून मोदी यांनी सत्तेचे केंद्रीकरण केल्याची टीका, राहुल गांधी यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर आणि गरीब लोक यांच्या झालेल्या हालावरूनही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.देशातील कोविड-१९ रुग्णांची संख्या गेल्या महिन्यात पाच लाखांच्या पुढे गेली तेव्हा राहुल गांधी म्हटले होते की, ‘मोदी सरकार कोविड-१९ साथीविरुद्ध लढायचे नाकारत आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ राहुल गांधी यांनी माध्यमांतील वृत्त पोस्ट केले होते.‘कोरोना विषाणू देशाच्या विविध भागांत पसरत असताना त्याविरुद्ध लढण्याची कोणतीही योजना सरकारकडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत’, असे टष्ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार