एक्स्प्रेसमधून अचानक बेपत्ता झाले केंद्रीय मंत्री; तीन तास सुरु होता शोध, सकाळी दुसऱ्या स्टेशनवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:20 IST2025-05-06T15:17:07+5:302025-05-06T15:20:27+5:30

केंद्रीय मंत्री जुएल ओराम हे रेल्वे प्रवासातून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

Central Union minister Jual Oraon missing from train found 162 km away | एक्स्प्रेसमधून अचानक बेपत्ता झाले केंद्रीय मंत्री; तीन तास सुरु होता शोध, सकाळी दुसऱ्या स्टेशनवर...

एक्स्प्रेसमधून अचानक बेपत्ता झाले केंद्रीय मंत्री; तीन तास सुरु होता शोध, सकाळी दुसऱ्या स्टेशनवर...

Union Minister Jual Oraon Missing from Train: भारतीय रेल्वेत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनेकदा प्रवाशांची चूकामूक होण्याच्या घटना घडत असतात. मात्र रेल्वेतून केंद्रीय मंत्री बेपत्ता झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली असेल. केंद्रीय मंत्री जुएल ओराम हे रेल्वे प्रवासातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम अचानक गोंडवाना एक्सप्रेसमधून गायब झाले. ते दिल्लीहून जबलपूरला जात होते. जुआल ओराम हे शेवटचे दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना दिसला होते. त्यानंतर सकाळी जेव्हा ते बर्थवर नसल्याचे कळताच एकच गोंधळ उडाला.

केंद्रीय मंत्री जुआल ओराम हे शनिवारी ३ एप्रिल रोजी दिल्ली ते गोंडवाना एक्सप्रेसने प्रवास करत होते. रविवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास गाडी
मध्य प्रदेशातील दमोह स्टेशनवर थांबली. त्याचवेळी जुआल ओराम यांची साखरेची पातळी कमी झाली आणि तो काहीतरी खाण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरले. मात्र तितक्यात गाडी सुरू झाली. केंद्रीय मंत्र्‍यांनी गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. सुदैवाने ते प्लॅटफॉर्मवरच पडल्यामुळे त्यांना जास्त दुखापत झाली नाही.

दुसरीकडे,  केंद्रीय मंत्री जुआल ओराम यांच्या कर्मचाऱ्यांना या सगळ्या प्रकाराबाबत काहीच कल्पना नव्हती. गोंडवाना एक्सप्रेस निघाली आणि संपर्क क्रांती एक्सप्रेस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली. केंद्रीय मंत्री ओराम हे या ट्रेनमध्ये चढले. जेव्हा कर्मचाऱ्यांना गोंडवाना एक्सप्रेसमध्ये त्यांची जागा  रिकामी आढळली तेव्हा सर्वांना धक्का बसला आणि शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर रेल्वे पोलिसांना या सगळ्या प्रकाराची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती कळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले. ट्रेन आणि ट्रॅकवर सुमारे ३ तास ​​शोध मोहीम राबवण्यात आली. यानंतर सकाळी ७ वाजता जबलपूरच्या सिहोरा स्टेशनवर संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या बी३ कोचमध्ये जुआल ओराम भेटले. त्यांच्या हाताला आणि पायाला जखमा होत्या. प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांना जबलपूरला आणण्यात आले. 

दरम्यान, ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यात जन्मलेले ओरांव एका अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातून आले आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द १९८९ मध्ये सुरू झाली. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर १९९० मध्ये बोनई विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन आमदार झाले. त्यानंतर, १९९८ मध्ये पहिल्यांदाच त्यांनी ओरांव सुंदरगड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली आणि तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने त्यांना १९९९ मध्ये आदिवासी व्यवहार मंत्री बनवले. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात ओरांव यांना आदिवासी व्यवहार मंत्री बनवण्यात आले. पण त्यांच्यानंतर अर्जुन मुंडा यांनी पदभार स्विकारला. पुन्हा मोदी सरकारच्या ३.० केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा आदिवासी व्यवहार मंत्री बनवण्यात आले.
 

Web Title: Central Union minister Jual Oraon missing from train found 162 km away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.