मध्य रेल्वेला मिळाले केवळ १ कोटी
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:24+5:302015-02-10T00:56:24+5:30
मध्य रेल्वेला मिळाले केवळ १ कोटी

मध्य रेल्वेला मिळाले केवळ १ कोटी
म ्य रेल्वेला मिळाले केवळ १ कोटीहायकोर्ट : तीर्थक्षेत्र शेगाव विकासाचे प्रकरणनागपूर : तीर्थक्षेत्र शेगाव विकासाची योजना ४७१ कोटी रुपयांची आहे. परंतु, मध्य रेल्वेला केवळ १ कोटी १५ लाख ९२ हजार रुपयेच मिळाले आहेत. मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. राज्य शासनाने २६ ऑक्टोबर २००९ रोजी शेगाव शहरातून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. २० ऑगस्ट २०१० रोजी अमरावती विभागीय आयुक्तांनी मध्य रेल्वेला केवळ १ कोटी १५ लाख ९२ हजार रुपयांचा धनादेश दिला. रेल्वेने अल्पावधीतच १३ लाख १७ हजार १२३ रुपयांची कामे केली. शासनाच्या मान्यतेनंतर दुसऱ्या फुट ओव्हर ब्रिजचे काम सुरू करण्यात येईल. राज्य शासनाने विकास आराखड्याला वेळेवर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा प्रतिज्ञापत्रात व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता संबंधित जनहित याचिकेवर ११ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.