शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

संसदीय मंडळातून नितीन गडकरींना वगळले; देवेंद्र फडणवीसांना निवडणूक समितीत स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 06:18 IST

भाजपमध्ये संघटनात्मक बदल; राष्ट्रीय पातळीवर देवेंद्र यांचा वाढता आलेख

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भाजपमधील मोठ्या संघटनात्मक बदलांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आले आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. निवडणूक समिती ही महत्त्वाची समिती असून लोकसभा आणि राज्यसभेसाठी ती उमेदवारांची निवड करते. फडणवीस यांची ही निवड राष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या वाढत्या आलेखाचे संकेत मानले जात आहे. 

बदलांमध्ये यांचे स्थान मजबूत 

स्थान मजबूत झालेल्यांमध्ये पर्यावरण आणि कामगार मंत्री भूपेंद्र यादव, राजस्थानचे ओम माथूर आणि तमिळनाडूतील आमदार व महिला मोर्चाच्या प्रमुख वनथी श्रीनिवासन यांचा समावेश आहे. आसामच्या मुख्यमंत्रिपदासाठी हिमंता बिस्वा सरमा यांचा मार्ग मोकळा करून देणारे सर्बानंद सोनोवाल यांनाही मंडळात मानाचे स्थान देण्यात आले आहे. बी. एल. संतोष, सरचिटणीस (संघटन) हे दोन्ही संस्थांचे सचिव आहेत.  

७५ वर्षांचा नियम ठेवला बाजूला  

संसदीय बोर्डाचे सर्व ११ सदस्य हे निवडणूक समितीचे सदस्य आहेत. जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा यात समावेश आहे. याशिवाय अन्य सात जणात कर्नाटकातून बी. एस. येडियुरप्पा, आसाममधून सर्बानंद सोनोवाल, तेलंगणातून के. लक्ष्मण, पंजाबचे इक्बाल सिंग लालपुरा आणि हरयाणातील सुधा यादव यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, येडियुरप्पा आणि जतिया यांचा समावेश करून ७५ वर्षांच्या नियमालाही बाजूला ठेवले आहे.

शिवराजसिंह चौहानांना वगळल्याने आश्चर्य

भाजपच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संसदीय मंडळातून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना वगळल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवराजसिंह चौहान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे समर्थक आहेत. एक ज्येष्ठ मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व व्यंकय्या नायडू यांचे निष्ठावंत म्हणून ते ओळखले जातात. नितीन गडकरी हे भाजपचे अध्यक्ष असताना ते गडकरी यांचेही निकटवर्तीय होते. ते जवळपास १७ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नवीन घोषणा, लोकप्रिय योजना जाहीर करणारे व कठोर मेहनत घेणारे मुख्यमंत्री असूनही ते सुशासन देऊ शकलेले नाहीत.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा