हेरगिरी प्रकरणी केंद्र सरकारने अमेरिकेला सुनावले
By Admin | Updated: July 2, 2014 13:09 IST2014-07-02T12:43:48+5:302014-07-02T13:09:57+5:30
केंद्र सरकारने अमेरिकेच्या राजनैतिक अधिका-यांना समन्स बजावला असून भारतातील एखादी संघटना किंवा व्यक्तीवर नजर ठेवण्याचे प्रकार अस्वीकाहार्य असल्याचे भारताने सुनावले आहे.

हेरगिरी प्रकरणी केंद्र सरकारने अमेरिकेला सुनावले
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २ - भाजपची हेरगिरी केल्याप्रकरणी केंद्र सरकारने अमेरिकेच्या राजनैतिक अधिका-यांना समन्स बजावला असून भारतातील एखादी संघटना किंवा व्यक्तीवर नजर ठेवण्याचे प्रकार अस्वीकाहार्य असल्याचे भारताने सुनावले आहे.
अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) २०१० मध्ये भारतातील भारतीय जनता पक्षाची हेरगिरी केल्याचा गौप्यस्फोट एडवर्ड स्नोडेनने केला होता. या वृत्तामुळे देशभरात खळबळ माजली होती. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी भारतातील अमेरिकेच्या राजनैतिक अधिका-यांना समन्स बजावले. भारत सरकार हेरगिरी खपवून घेणार नाही. यापुढे असे प्रकार व्हायला नकोत अशी तंबीच भारत सरकारने अमेरिकेला दिली आहे.
एडवर्ड स्नोडेनने मंगळवारी अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये एनएसएच्या हेरगिरी प्रकरणाचा खुलासा केला. एनएसएने सहा देशांमधील राजकीय पक्षांची हेरगिरी केली होती. यात भारतातील भाजपचाही समावेश होता. परदेशातील गोपनीय माहिती मिळवण्याच्या दृष्टीने या पक्षांवर नजर ठेवण्यात आली होती.