शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी फुटीरवाद्यांवर केंद्र सरकारचा ३५६ कोटी रुपये खर्च

By admin | Updated: September 9, 2016 04:45 IST

काश्मिरी फुटीरवाद्यांवर सरकारचे गेल्या पाच वर्षांमध्ये ३५६ कोटी रुपये खर्च झाला असून, केंद्राच्या निधीतून होणारा हा खर्च थांबवावा अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरवाद्यांवर सरकारचे गेल्या पाच वर्षांमध्ये ३५६ कोटी रुपये खर्च झाला असून, केंद्राच्या निधीतून होणारा हा खर्च थांबवावा अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने सुप्रीम कोर्टात केली असून, यावर १४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमुर्ती ए. आर. दवे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने गुरुवारी हा निर्णय दिला. वकील एम. एल. शर्मा यांनी ही याचिका व्यक्तिगत पातळीवर केली आहे. फुटीरवाद्यांना दिल्या जाणाऱ्या कथित निधीची केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. भारताच्या एकीकृत निधीतून फुटीरवादी गटांना कोणत्याही अधिकाराशिवाय व कायदेशीर परवानगीशिवाय पैसे दिले जाणे चूक आहे, असे जाहीर करावे, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. हे गट देशाविरोधात काम करीत असून त्यांना पैसा पुरवणे हे घटनेच्याविरोधात, बेकायदा व भारतीय दंड विधानाचे कलम ४०९ नुसार गुन्हेगारी स्वरुपाचा विश्वासघात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. शर्मा यांनी विविध प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तांचा हवाला देऊन म्हटले आहे की फुटीरवाद्यांना राहणे, प्रवास करणे व इतर उद्देशांसाठी दिल्या जाणाऱ्या पैशांचे औचित्य काय? न्यायालयानेही तुमच्या या भावनेशी आम्ही सहमत असल्याचे म्हटले. देशविरोधात काम करणाऱ्यांना सरकार पैसा पुरवू शकत नसल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)फुटीरवाद्यांची सरकारी पैशांवर मौजभारताने गेल्या पाच वर्षांत या फुटीरवाद्यांचा प्रवास, सुरक्षा आणि हॉटेल्समधील मुक्कामावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. भारतविरोधातील फुटीरवाद्यांची मोहीम चालविण्यासाठी त्यांच्या प्रवासावर सरकारने २६.४३ कोटी रुपये व फुटीरवाद्यांच्या ऐषोरामी हॉटेल्समधील मुक्कामावर २१ कोटी रुपये खर्च केल्याचे याचिकेत म्हटले आहे. या खर्चाचा बोजा संसदेला न कळवता करदात्यांवर लादण्यात आला आहे व देशाच्या महालेखापालांनीही हा निधी कसा वापरला गेला याचा अहवाल कधीही सादर केलेला नाही, असे शर्मा यांनी म्हटले आहे.