शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

जम्मू-काश्मीरचं विभाजन होणार? अनेक तुकडे केले जाणार?; मोदी सरकारनं स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 9:52 AM

पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण; सरकारकडून अफवांचं खंडन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली २४ जूनला जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवून जवळपास दोन वर्षे होत आली आहेत. या दोन वर्षांत प्रथमच पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. पुढील आठवड्यात होत असलेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागलं आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह सरकारमधील महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार असल्याचा माहिती समोर आल्यानंतर जम्मू-काश्मीर संदर्भात अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या जात आहेत. जम्मू-काश्मीरचं विभाजन होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांचं सरकारमधील उच्चपदस्थ सुत्रांनी खंडन केलं आहे. जम्मू-काश्मीरचे तुकडे केले जाणार असल्याच्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारचा असा कोणताही विचार नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.काँग्रेस सत्तेत आल्यास काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणू; दिग्विजय सिंहांच्या कथित क्लिपवरून भाजप आक्रमक

जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या घडामोडी पाहता विविध प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. जम्मूला लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा मिळू शकतो, असा कयास आहे. तर काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणूनच ठेवलं जाईल, अशा चर्चांची जोर धरला आहे. दक्षिण आणि उत्तर काश्मीर वेगळं आणि श्रीनगर वेगळं केलं जाईल, अशा चर्चादेखील ऐकायला मिळत आहेत. या सगळ्या चर्चा, शक्यता, अफवांचं सरकारशी संबंधित सुत्रांनी खंडन केलं आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर/डिसेंबर २०२१ किंवा मार्च/एप्रिल २०२२ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेतली जाऊ शकते. विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी केंद्र सरकार जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा विचार करत असल्याचं वृत्त सीएनएन-न्यूज १८ नं दिलं आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370