शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने ट्विटरला दिला निर्वाणीचा इशारा, नव्या नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाईची बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 05:53 IST

central government issued a warning to Twitter : केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने जारी केलेल्या या नोटिसीत म्हटले आहे की, सोशल मीडिया कंपनीसाठी तयार केलेले नवीन नियम पाळणार की नाही, याबाबत ट्विटरने केंद्र सरकारकडे अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.

नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपन्यांसाठी केलेल्या नव्या नियमांचे पालन करा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देणारी अंतिम नोटीस केंद्र सरकारनेट्विटरला शनिवारी बजावली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने जारी केलेल्या या नोटिसीत म्हटले आहे की, सोशल मीडिया कंपनीसाठी तयार केलेले नवीन नियम पाळणार की नाही, याबाबत ट्विटरनेकेंद्र सरकारकडे अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. या नव्या नियमांनुसार ट्विटरने केंद्र सरकारशी संपर्क साधणे आवश्यक होते. त्यामुळे हे नियम न पाळल्यास ट्विटरला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या नोटिसीत देण्यात आला आहे.

ट्विटरसह अन्य सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारने बनविलेले नवीन नियम पाळणे बंधनकारक आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले होते. त्यावेळी आम्ही हे नियम पाळणार आहोत व त्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूकही केली आहे, असे ट्विटरने न्यायालयाला सांगितले होते. मात्र, ट्विटरने केलेले दावे केंद्र सरकारने फेटाळून लावले होते.नव्या नियमांमुळे लोकांच्या खासगीपणाच्या हक्कावर गदा  येते, असा आक्षेप सोशल मीडिया कंपन्यांनी घेतला होता. मात्र, हळूहळू काही कंपन्यांचा विरोध मावळला. ट्विटरने नवे नियम पाळण्यास तयारी दाखवूनही केंद्राला न कळविल्याने आता सरकारने कडक पवित्रा घेतला आहे.

उपराष्ट्रपतींच्या खात्याची निळी टीक पुन्हा बहाल- केंद्र आणि ट्विटर यांच्यातील संघर्ष टीपेला पोहोचला असून, त्याचा नवा अंक शनिवारी पाहायला मिळाला. सरकारने नोटीस बजावली असतानाच ट्विटरनेही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक भाजप व आरएसएस नेत्यांच्या ट्विटर अकाउंटची ‘निळी टीक’ काहीकाळ हटवून पुन्हा बहाल केली. - हा सरकारवर दबाव टाकण्याचा एक प्रयत्न होता, असे समजते. याबाबत ट्विटरने म्हटले की, ‘उपराष्ट्रपतींकडून खात्यावर दीर्घ काळापासून लॉगइन केले नसल्याने ‘निळी टीक’ हटविली होती. दोन तासांत ती पुन्हा बहाल केली.’

टॅग्स :Twitterट्विटरCentral Governmentकेंद्र सरकारSocial Mediaसोशल मीडिया